शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Vijay Kadam Death : “सच्चा कलाकाराला गमावल्याचं दुःख”, विजय कदमांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टी हळहळली, कलाकारांना दुःख अनावर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2024 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vijay Kadam Death

सुप्रिसद्ध अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली, अभिनेत्यांनी व्यक्त केली हळहळ

Vijay Kadam Died : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून विजय कदम हे कर्करोगाशी झुंज देत होते. अखेरीस त्यांची ही कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. विजय यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. विजय यांनी कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मश्री व मुलगा गंधार कदम हे आहेत. त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Vijay Kadam Death : मराठी नाटक, मालिका, चित्रपटांचे राजा होते अभिनेते विजय कदम, जाणून घ्या त्यांचा प्रवास व गाजलेल्या कलाकृतींच्या आठवणी

View this post on Instagram

A post shared by Sunil Tawade (@tawades)

विजय कदम यांच्या निधनावर चाहते व सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत. अभिनेते सुनील तावडे यांनी विजय कदम यांचा फोटो शेअर करत “भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा”, असं कॅप्शन देत पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर सचिन गोस्वामी, विशाखा सुभेदार यांनी देखील विजय यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. “गेले पण विसरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो”, असं म्हणत अभिनेत्री अश्विनी भावे हिने देखील विजय यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – Vijay Kadam Death : शेवटच्या दिवसांमध्ये असे दिसत होते विजय कदम, कोणालाच होणारा त्रास कळू दिला नाही अन्…; निधनापूर्वी काय घडलेलं?

तर मानसी नाईक, पुष्कर जोग, प्रसाद ओक या कलाकारांनीही दुःखद बातमी म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. “माझा मित्र विजय कदम याच्या आत्म्यास शांती लाभो असं म्हणणंही कठीण वाटत आहे”, असं म्हणत अजिंक्य देव यानेदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना प्रत्येकजण व्यक्त करताना दिसत आहे. अनेक कलाकार विजय यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

Tags: marathi actorVijay Kadam DiedVijay Kadam Passed Away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Bigg Boss Marathi season 5 riteish deshmukh on jahnavi killekar

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखच जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढणार, 'त्या' वक्तव्यावरुन थेट सुनावलं, ढसाढसा रडू लागली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.