Vastu tips Home main door direction : घराची रचना योग्य पद्धतीने असावी यासाठी कित्येकजण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतात. घरात सकारात्मकता असावी यासाठी आपण धडपड करत असतो. पण हे सगळं करत असताना अगदी बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. घराचा दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा?, त्याचा फायदा काय? याबाबतही माहिती मिळवणं महत्त्वाचं आहे. सकारात्मक गोष्टींना यामुळे अधिक चालना मिळते. घराच्या दरवाजाची दिशा काय असावी? याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. दक्षिण दिशेला दरवाजा असल्यास काय करावं? वास्तुशास्त्र काय सांगतं? याविषयी समजून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरात येणारी ऊर्जा सकारात्मक राहण्यासाठी काही उपाय अवश्य करावेत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये येणारी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ही घरातील छोट्या-छोट्या गोष्टींवरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घरात अप्रिय किंवा नकारात्मक घटना घडण्याची शक्यता लक्षणीय वाढते. कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा आहे, असे मानले जाते. दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा बनवला जात नाही. पण माहितीच्या अभावामुळे अनेकांचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला बनवला जातो. शहरांसारख्या भागात जागेच्या अभावीही दरवाजा दक्षिण दिशेला करणं भाग होतं. पण ते शुभ मानले जात नाही. जर काही कारणास्तव तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर महत्त्वाचे उपाय फायदेशीर ठरु शकतात.
आणखी वाचा – हिंदू असूनही एआर रेहमान यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला?, ‘त्या’ एका कारणामुळे मोठा निर्णय घेतला अन्…
घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्यास काय करावे?
जर तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही श्रीगणेशाची मूर्ती दक्षिण दिशेला लावावी. यामुळे घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असल्याचा अशुभ प्रभावही कमी होतो. ही गणेशमूर्ती रोज स्वच्छ करा. लक्षात ठेवा, घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तरच देवाची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी. दक्षिण दिशेला आशिर्वाद मुद्रेत हनुमानजींचे चित्र लावावे. याशिवाय दक्षिण दिशेला पंचमुखी मारुतीचे चित्रही लावू शकता. त्यामुळे मारुतीराया तुमच्या घरावर आशीर्वाद देतील आणि तुमचे सर्व संकट दूर होण्यास मदत मिळे.
आणखी वाचा – घरात कापूरचा वापर केल्यास खरंच सकारात्मक उर्जा मिळते का?, शास्त्र काय सांगतं?
घरामध्ये निवडुंगाचे रोप लावणे शुभ मानले जात नाही. परंतू, घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्याने उपाय म्हणून निवडुंग लावल्यास त्याचे अशुभ प्रभाव दूर होतात. घरामध्ये कॅक्टस किंवा हॉथॉर्नचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. जर तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही त्या दिशेच्या विरुद्ध असलेल्या भिंतीवर मोठा आरसा लावावा. यामुळे दरवाजा उघडताच घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते. तर या काही महत्त्वाच्या उपायांमुळे दक्षिणेकडचा प्रवेश हा कायम प्रसन्न आणि सकारात्मक राहू शकतो.
टीप – वरील दिलेल्या माहितीची ITSMAJJA पुष्टी करत नाही. तुम्ही याबाबत योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.