बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची मराठी मालिकेत एन्ट्री, वेगळ्या अंदाजात दिसणार अभिनेत्री, प्रोमो समोर

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 31, 2023 | 1:49 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Vanita Kharat new Role

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची मराठी मालिकेत एन्ट्री, वेगळ्या अंदाजात दिसणार अभिनेत्री, प्रोमो समोर

अभिनेत्री वनिता खरात ही छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली. ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनिताने तिच्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळेच आज तिचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. वनिताने केवळ मालिकेपुरतं मर्यादित न राहता आपला मोर्चा चित्रपटाकडे वळवला आणि त्यात प्रेक्षकांची मने जिंकण्यात तिला यश आले. मग तो ‘वाळवी’, ‘सरला एक कोटी’ हे मराठी चित्रपट असो किंवा ‘कबीर सिंग’ हा हिंदी चित्रपट. गेली अनेक वर्ष विनोदी पात्रांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारी वनिता आता एक वेगळी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. (Vanita Kharat new Role)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सह अनेक विनोदी कार्यक्रमांत खळखळून हसवल्यानंतर वनिता आता एका मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत वनिता ‘साहेब’ हे पात्र साकारताना दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आला. ज्यामध्ये वनिता वेगळ्या अंदाजात पाहायला मिळते. मालिकेची नायिका एक अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करते. मात्र, ते रोखण्यासाठी वनिता तिथे येताना या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या मालिकेत वनिताची नेमकी काय भूमिका असणार, हे पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत.

हे देखील वाचा – Video : …अन ऐश्वर्या नारकर खड्ड्यात पडल्या, असा शूट झाला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’चा ‘तो’ सीन, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक चाहती यावर म्हणाली, “व्वा वनिता, या वेगळ्या रूपातही तू बाजी मारणार.” तर आणखी एका चाहतीने “खूप सुंदर काम केलं आहे” अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री ईशा डेने वनिताचं अभिनंदन करत तिचे कौतुक केले. त्याचबरोबर, मालिकाविश्वातील अनेक कलाकारांसह चाहत्यांनीही वनिताचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा – कोल्हापुरमध्ये बंगला घेतला, फार्महाऊस तयार केलं अन्…; भरत जाधव यांनी कायमची सोडली मुंबई, म्हणाले, “वडिलांची…”

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

दरम्यान, याआधी वनिताने सोनी मराठीवरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेत काम केलं आहे. तसेच, ‘एकदा येऊन तर बघा’ हा तिचा चित्रपटदेखील लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: marathi serialsun marathivanita kharatVanita Kharat new Role
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
kranti redkar comment on sai lokur video

“झोपून घे बाई...”, सई लोकूरच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली, “तुला व तुझ्या येणाऱ्या बाळाला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.