शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या वाढदिवशी वैभव मांगले बायकोसह कोकणात करत आहेत एन्जॉय, शेअर केला सुंदर व्हिडीओ, म्हणाले, “आमचं लग्न…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 5, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vaibhav Mangale reached Konkan

लग्नाच्या वाढदिवशी वैभव मांगले बायकोसह कोकणात करत आहेत एन्जॉय, शेअर केला सुंदर व्हिडीओ, म्हणाले, “आमचं लग्न...” |

मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’सारख्या मालिका व ‘काकस्पर्श’, टाईमपास’, ‘शाळा’, ‘कुटुंब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या विविधांगी भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या विविधांगी भूमिकांबरोबरच वैभव मांगले हे  सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटोज व व्हिडीओ शेअर करतात. शिवाय, ते विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्य करताना दिसतात. अशातच त्यांनी नुकताच त्यांच्या पत्नीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वैभव मांगले यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘ये कहां आ गये हम’ हे गाणं लावलं आहे. या व्हिडीओखाली त्यांनी “आज आमचं लग्न १८ वर्षांचं झालं” असंही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by vaibhav mangale (@vaibhavmangale)

आणखी वाचा – तन्वीने दिली आत्महत्येची धमकी, अर्जुनने या सगळ्याला पूर्णा आजीला धरलं जबाबदार, सायली मिटवू शकेल का हा अबोला?

वैभव मांगले हे कोकणातील असून याआधी त्यांनी अनेकदा त्यांच्या गावचे व्हिडीओ शेअर केले आहेत. वैभव मांगले हे सध्या त्यांच्या गावी कोकणात गेले असून तिथे ते त्यांच्या पत्नीसह कोकणातील पावसाचा व निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत आणि याचेच काही खास क्षण त्यांनी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. त्यामुळे वैभव यांनी त्यांच्या पत्नीबरोबर शेअर केलेला व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हार्दिकने माझ्याकडे बघून…”

दरम्यान, वैभव मांगले यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर  या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे म्हटले आहे.    

Tags: marathi actormarathi entertainment newsvaibhav mangale
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Marathi actor Aastad Kale shared an emotional post in memory of his mother on her birthday

आईच्या आठवणीत आस्ताद काळे भावुक, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट, म्हणाला, “दु:ख आहे पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.