“कोसला” कादंबरीने लोकप्रिय झालेले आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या लिखानामुळे जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रकाशझोतात येतात. मात्र आता त्यांनी नुकतंच एका कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. (Bhalchandra Nemade Controversial Statement)
मुंबईतील दादर येथे एका कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब व पेशव्यांबद्दल खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठत आहे. अशातच अभिनेते वैभव मांगले यांनीही एक पोस्ट शेअर करत भालचंद्र नेमाडे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. (Vaibhav Mangale on Bhalchandra Nemade Controversial Statement)
हे देखील वाचा – “‘मुळशी पॅटर्न’ने १०० कोटी रुपये कमावले असते, पण…”, प्रवीण तरडेंनी बोलून दाखवली खंत; म्हणाले, “काही कारण नसताना…”
अभिनेते वैभव मांगले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत भालचंद्र नेमाडे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. वैभव यांनी पोस्ट करत लिहिलं, “एवढ्या मोठ्या लेखकाने अशी दैनंदिनीशी निगडित नसलेली किंवा त्यांनी रोजच्या कार्यक्रमात सूतराम ही फरक पडणार नाही अशी विधाने का करावीत ???”. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे.
हे देखील वाचा – “गुन्हेगार टॉयलेट करताना त्यांच्यासमोर उभा राहतो कारण…” समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “चार ते पाच दिवस…”

अभिनेते वैभव मांगले यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये काम केलं आहे. ते नुकतेच ‘टाईमपास ३’ चित्रपटात दिसले आहेत. शिवाय ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. (Vaibhav Mangale)