अभिनेत्री उर्मिला कोठारेने मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर आता उर्मिला ने पुन्हा एकदा सिनेविश्वात दमदार पदार्पण केलं आहे. अभिनयासोबतच उर्मिलाला क्लासिकल डान्सची प्रचंड आवड आहे. ती तिचे अनेक नृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्याची आवड असल्याने ती क्लासेसही घेत असते. उर्मिलाचा सोशल मीडियावरील वावर हा खूप मोठा आहे. सोशल मीडियावर उर्मिला ऍक्टिव्ह असते. तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे, तिच्या या व्हिडीओजला तिचे चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.(urmila kothare)
पहा उर्मिलाची खास पोस्ट (urmila kothare)
अशातच उर्मिलाने सोशल मीडियावर एक नृत्य करतानाच व्हिडीओ पोस्ट केला आहे. आज रामनवमीचे औचित्य साधत उर्मिलाने श्री राम चंद्र या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. पिवळ्या रंगाची साडी परिधान करून तिने अगदी निरागसतेने केलेल हे नृत्य पाहणं मोहक वाटतंय. तर कॅप्शन मध्ये तिने जय श्री राम असे लिहिले आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी खूप सुंदर नृत्य असे म्हणत कमेंट केली आहे.

मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला कोठारे छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली. स्टार प्रवाहवर वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिलाने तब्बल 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. अभिनयासोबतच ती तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत असते. उर्मिलाला डान्सची आवड आहे म्हणून ती इंस्टग्राम अकाउंटवर आपले हटके डान्स व्हिडीओ पोस्ट करून चर्चेत असते.(urmila kothare)
हे देखील वाचा – राजकारणी किंवा सिस्टम जागवत नाही म्हणत अश्विनीचा व्हिडीओ चर्चेत
उर्मिलाने छोट्या जिजालाही डान्सचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. जिजालाही ती अधूनमधून डान्स स्टेप शिकवतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. तर या व्हिडिओंमध्ये जिजाही तिच्या आईचे स्टेप्स फॉलो करताना दिसते. या दोघींचा क्युट अंदाज पाहणे नेहमीच रंजक ठरतो. डान्स व्हिडिओसोबत आता त्यांच्या फोटोशूटने ही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. गुढीपाडव्याला या मायलेकींनी पारंपारिक वेशात खूप गोड फोटोशूट केलं होत या त्यांच्या फोटोशूटलाही चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
