जगात प्रत्येकाला आपली वयक्तिक मत मतांतरे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मग तो सामान्य मनुष्य असो किंवा कोणताही सेलिब्रेटी. कधी कधी कलाकारांनी मांडलेली काही मत एकढ्याला न पटल्यामुळे एकमेकांचे विचार विरोधात पेटून उठतात. असच काहीस घडलं आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये. काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा स्त्रियांबद्दल वक्तव्य असलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत ठरतोय.(urfi javed sonali kulkarni controversy)
सोनाली कुलकर्णी एका कार्यक्रमात बोलताना ‘भारतात खूप मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवाय, ज्याच्याकडं चांगली नोकरी आहे. ज्याच्याकडं घर आहे. त्याला खात्री हवी की त्याचा पगार वाढणार आहे. पण त्या मुलीमध्ये इतकीही हिंमत नाही हे बोलायची की, मी काय करू तुझ्यासाठी, जेव्हा तू माझ्याशी लग्न करशील. मी आवाहन करते की, तुमच्या घरात अशा महिला निर्माण करा की, ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील. घरातले खर्च वाटून घेऊन शकतात. यात भांडणं लावायची नाहीत. पण इतकंच म्हणायचं आहे की, महिलेनं सक्षम असाव.’ असं म्हणाल्या होत्या तर याचा हाच व्हिडिओ ट्विटर शेअर करत उर्फी जावेद ने या वक्तव्यावर टीका केली आहे.

ट्विटर वर व्हिडिओ पोस्ट करत उर्फी म्हणते ‘किती असंवेदनशील आहे, जे तुम्ही बोललात! आधुनिक काळातील महिलेला आळशी म्हणताय, जेव्हा ती घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळत आहे. चांगला कमवणारा नवरा असावा, असं वाटणं यात चुकीचे काय आहे? अनेक शतकांपासून स्त्रीयांकडं फक्त मुलांना जन्म देणारं यंत्र म्हणून पाहिलं गेलंय. आणि लग्नाचं कारण म्हणजे हुंडा. महिलांनो तुम्हाला जे हवं ते मागण्यासाठी घाबरू नका. महिलांनी काम करायला हवंच. पण सगळ्यांनाच हा विशेषाधिकार मिळतोच असं नाही’. असं म्हणत उर्फी ने सोनाली कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे.(urfi javed sonali kulkarni controversy)
=====
हे देखील वाचा – ‘मी मूळचा कलावंत नव्हे..’ असे म्हणणाऱ्या दादा कोंडकेंनी गाजवलं सिनेविश्वात एक युग
=====
तर आता उर्फीच्या टीकेला सोनाली कुलकर्णी कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक दिसत आहेत.