साऊथ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडलेल्या रश्मीका मंदान्नाने सगळ्यांनाच वेड लावलं. साऊथच नव्हे तर संपूर्ण जगात रश्मिकाने आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची भुरळ घातली आहे. कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये रश्मिकाने उत्तम काम केले आहे. या साऊथ अभिनेत्रीने आता बाॅलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. हिंदी नंतर आता महाराष्ट्रातल्या एका मराठी कार्यक्रमालाही रश्मिका ने उपस्थित राहून चारचाँद लावलेत. (rashmika mandanna)
यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली ‘रश्मिका मंदान्ना’ होती. यंदाच्या या कार्यक्रमात रश्मिका आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे. या लावणीची विशेष बाब म्हणजे रश्मीकाने ही लावणी वन टेक मध्ये केली आहे. रश्मिकाने हजेरी लावलेल्या या मराठी कार्यक्रमात रश्मिकाने तिचं मराठी गाण्यांसोबत असलेलं नातं सांगितलंय.
पहा रश्मिकाच मराठी गाण्यांसोबतच खास नातं (rashmika mandanna)

नुकताच रश्मिकाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत तिने मराठी गाण्यांसोबतच असलेलं खास नातं उघड केलंय. “मी लहानपणी ‘ऐका दाजीबा’ या गाण्यावर डान्स केला होता. तेव्हाच माझी मराठी गाण्यांशी ओळख झाली. त्यानंतर आता अनेक वर्षांनी लावणी सादर करत आहे. त्यामुळे या निमित्ताने माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत आणि आता ही लावणी करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण मी पहिल्यांदाच लावणी सादर करतेय. मला आशा आहे की माझा हा डान्स तुम्हा सर्वांना आवडेल.”(rashmika mandanna)
====
हे देखील वाचा – महेश मांजरेकरांच्या लेकाने अभिनयाव्यतिरिक्त सुरु केला हा व्यवसाय
====
अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. तिच्या स्माइलचे लाखो चाहते आहेत. तिच्या पोस्टवर तिचे फॉलोअर्स सोशल मीडियावरून नेहमीच तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय झालेल्या रश्मीकाने गीता गोविंदा, चल प्रिये, कॉम्रेड, सुलतान आणि पुष्पा यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
