Udit Narayan Kiss Video : बॉलिवूड गायक उदित नारायण सध्या चर्चेत आले आहेत. थेट मैफिलीत महिला चाहतीला किस केल्यानंतर उदित नारायण ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकले आहेत. लाईव्ह परफॉर्मसनदरम्यान उदित नारायण यांचे काही चाहते स्टेजजवळ आले आणि त्यांनी तात्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यास सुरुवात केली तेव्हा उदित नारायण मैफिलीत ‘टीप टीप बरसा पाणी’ हे गाणं गात होते. चाहतीने त्यांच्याबरोबर सेल्फी घेतल्यानंतर उदित नारायणे नारायणने चाहतीच्या ओठांवर किस केले. त्यानंतर एक बातमी समोर आली आहे. आता त्याचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गायकाने अभिनेत्रींना किस केलं आहे.
उदित नारायण यांचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात तो अल्का याग्निक, श्रेया घोषाल आणि करिश्मा कपूर यांना किस करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण यांची ही कृती धक्का देणारी आहे. गायिका, अभिनेत्रींना उदित यांनी किस केल्यानंतर त्या फारच संकोचलेल्या दिसल्या. अल्का यग्निकला किस करताना उदित यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना इंडियन आयडॉलच्या सेटवर झाली आहे. ज्यामध्ये तो त्याच्या अभिव्यक्तीवरुन स्पष्ट आहे की तो सेफ नाही. त्यानंतर दुसरा व्हिडीओ म्हणजे श्रेया घोषाल. गायिकेला सर्वोत्कृष्ट महिला गायक पुरस्कार मिळताच उदित नारायण यांनी किस घेताच तिला धक्का बसला. जेव्हा उदित नारायणने करिश्मा कपूरला किस केले तेव्हा ती इतर गायकांप्रमाणेच आश्चर्यचकित झाली.
आणखी वाचा – मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरचा लग्न करण्याचा निर्णय?, म्हणाला, “रिअल पत्नीबद्दल…”
या वादानंतर, उदित नारायण यांनी ‘बॉलिवूड हंगामा यांना दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलले. ते म्हणाले की, “मी असे काहीतरी केले आहे जे मी स्वत: ला, माझे कुटुंब किंवा माझ्या देशाला गौरवितो. मग जेव्हा मी सर्व काही साध्य केले तेव्हा मी आता माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर काहीतरी का करावे? मी आणि माझ्या चाहत्यांमध्ये एक खोल, पवित्र आणि अतूट संबंध आहे. आपण व्हिडीओमध्ये जे पाहिले ते म्हणजे मी आणि माझ्या चाहत्यांमधील प्रेमाचे प्रकटीकरण. ते माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांच्यावर आणखी प्रेम करतो”.
आणखी वाचा – Video : प्रचंड वेदना असतानाही सोनू निगमने केला शो, गायकाला चालताही येईना अन्…; व्हिडीओ व्हायरल
या ट्रोलिंगनंतर उदित नारायण म्हणाले की, “या परिस्थितीबद्दल मला कोणतीही लाज किंवा खेद वाटत नाही. नाही, अजिबात नाही! आता बोलताना माझ्या आवाजातून तुम्हाला काही खंत किंवा दुःख ऐकू येते का? खरं तर, मी बोलत असताना हसतो. ही काही गुप्त गोष्ट नाही. माझे हृदय स्वच्छ आहे. जर काही लोकांना माझ्या या प्रेमात काही घाणेरडेपणा पहायचा असेल तर मी त्यांच्यासाठी दिलगीर आहे. मला त्याचे आभार मानायचे आहेत, कारण आता त्यांनी मला पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्ध केले आहे”.