Arjun Kapoor On His Marriage : गेल्या वर्षी अभिनेता अर्जुन कपूरच्या आयुष्यात बरेच काही घडले ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे, जेव्हा त्याने खलनायकाच्या रुपात ‘सिंघम अगेन’ मधून जोरदार पुनरागमन केले, तेव्हा वैयक्तिक आयुष्यात मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपमुळे तो बर्याच चर्चेत राहिला. अभिनेता आता त्याच्या ‘मेरे हसबैंड की बीवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर भुमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासमवेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान, अभिनेत्याला लग्नाबद्दल विचारण्यात आले होते, यावेळी अभिनेत्याने स्पष्टपणे भाष्य केले. अर्जुन कपूरला विचारले गेले होते की, “या चित्रपटात तुमची पूर्वाश्रमीची पत्नी आहे, सध्याची पत्नी आहे तर मग खऱ्या आयुष्यात तू लग्नाची तयारी करत आहेस की नाही?”
या प्रश्नावर अभिनेत्याने दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरत आहे. अर्जुन कपूर उत्तर देत म्हणाला, “जेव्हा मी लग्न करणार असेन तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन. आज चित्रपटाबद्दल चर्चा करण्याची आणि चित्रपटाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. तर आपण चित्रपटाबद्दल बोलूया”. अर्जुन पुढे एक मजेदार पद्धतीने म्हणाला, “मला वाटते की मी आता माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो आहे. तर आता या चित्रपटाबद्दल बोलूया”.
आणखी वाचा – Grammy 2025 Award Winners List : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचा बोलबाला, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
अर्जुन पुढे म्हणाला, “जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी लग्न करणार असल्याचं सांगायला मला अजिबात संकोच होणार नाही. मी काय आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. चला आता माझ्या चित्रपटातील पत्नीबद्दल बोलूया, जेव्हा माझी खरी पत्नी येईल तेव्हा आपण तिच्याबद्दल बोलू”. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. कोविडच्या वेळी दोघेही एकत्र राहत होते. दोघांनी बर्याचदा सोशल मीडियावर रोमँटिक छायाचित्रे शेअर केली. पण नंतर २०२४ मध्ये ते दोघे अचानक वेगळे झाले असल्याचं समोर आलं. या दोघांपैकी एकानेही या ब्रेकअपचे खरे कारण दिले नाही.
नंतर, जेव्हा मलायका अरोरा ‘इटाइम्स’ला मुलाखत देत होती, तेव्हा तिने अर्जुनच्या ‘मैं सिंगल हू’ला प्रतिसाद दिला. अभिनेत्री म्हणाली होती, “मी खूप खासगी व्यक्ती आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याचे काही पैलू आहेत, ज्याबद्दल मला सविस्तरपणे बोलणं योग्य वाटत नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर मी सार्वजनिक ठिकाणी बोलावे अशी माझी इच्छा नाही”.