Udit Narayan Fan Moment : उदित नारायण हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ गायक आहेत. त्यांनी आजवर त्यांच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे. उदित यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. अलीकडेच, एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान, सिंगरने एका महिला चाहतीबरोबर असे कृत्य केले की, आता गायकाला ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओमध्ये उदित नारायण ‘टीप टिप बरसा पाणी’ हे गाणं सादर करीत होते. दरम्यान, त्यांची एक महिला चाहती त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर आली.
तेव्हा एका महिला चाहतीने मागे वळून त्यांच्या गालावर किस केले. यानंतर, गायकानेही त्या महिलेच्या ओठांवर किस केले. यानंतर, दुसर्या एका महिला चाहतीने सेल्फी घेण्यासाठी उदित यांना गाठले, त्यानंतर गायकाने तिच्या गालावरही किस केले. आता उदित नारायण यांचा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान महिला चाहतीला किस घेण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – वयाच्या ५९व्या साली आमिर खान प्रेमात?, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, कुटुंबासह भेटही घडवली अन्…
WTF! what is Udit Narayan doing 😱 pic.twitter.com/Rw0azu72uY
— Abhishek (@vicharabhio) January 31, 2025
उदित नारायण यांच्या किस घेणार्या महिला चाहत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचवेळी एक गोंधळ उडाला आहे. ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. एका नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिले, “बंधू, उदित जी यांना गाणं गाण्याशिवाय आणखी बरंच काही मिळालं”. तर दुसर्या एकाने लिहिले, “थरकी”, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “त्यांच्या घटस्फोटाची बातमी लवकरच येणार आहे”. तर एकाने लिहिले आहे की, “आदित्य आपल्या वडिलांना सांभाळ”.
आणखी वाचा – आलिशान घर, महागड्या कार अन्…; ‘लाफ्टर शेफ’मधील ‘हे’ कलाकार जगतात असं आयुष्य, सगळं काही आहे खास
उदित नारायण यांनी अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शो नंतर चाहती अस्वस्थ झाली की नाही हे स्पष्ट नसले तरी गायकाने त्या महिलेच्या ओठांवर किस केले तेव्हा तिला आश्चर्य वाटले हे निश्चित. मात्र बरेच चाहते गायकाला पाठिंबा देत आहेत. बहुतेक नेटिझन्सने असे मत दिले आहे की, शोमध्ये चाहत्यांकडून सावध राहा.