Tina Dutta : ‘उतरन’ व ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री टीना दत्ता ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांची आवडती राहिली. याशिवाय अभिनेत्री तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ३३ वर्षीय टीना अविवाहित आहे. मात्र आता ती पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे कारण लग्न न करता तिने मातृत्वाबद्दल भाष्य केलं आहे. टीनाने भविष्यात ती ‘सिंगल मदर’ व्हायचा मोठा निर्णय घेऊ शकते, असं म्हटलं आहे. ‘उतरण’ सारख्या टीव्ही मालिकेमुळे टीना प्रसिद्धीच्या झोतात आली. टीनाच्या मते, तिने सिंगल मदर व्हायचं ठरवलं नसलं तरी ती सरोगसी किंवा दत्तक घेणे या पर्यायांचा विचार करत असल्याचं समोर आलं आहे.
न्यूज एजन्सी आयएएनएसला दिलेल्या मुलाखती दरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की तिने ‘सिंगल मदर’ साठी विशेष नियोजन केले नाही, परंतु ती दत्तक किंवा सरोगेसीद्वारे आई होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. टीना म्हणाली, “मला वाटते की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एक चांगली आई होईल. मी एकट्या आई होण्याची योजना आखली नाही, परंतु मी या कल्पनेसाठी खुश आहे”. अभिनेत्रीने सिंगल मदर स्वीकारलेल्या महिलांचेही कौतुक केले. ती म्हणाली, “मी सुष्मिता सेनसारख्या महिलांचे कौतुक करते, ज्यांनी दोन सुंदर मुलींना दत्तक घेतले.
आणखी वाचा – आलिशान घर, महागड्या कार अन्…; ‘लाफ्टर शेफ’मधील ‘हे’ कलाकार जगतात असं आयुष्य, सगळं काही आहे खास
ती म्हणाली, “माझे आई-वडील एका छोट्या शहरातील आहेत आणि मी बंगाली आहे. असे असूनही, ते खूप प्रगत विचारांचे आहेत. मी मूल दत्तक घ्यायचे ठरवले किंवा सरोगसीद्वारे मूल हवं असं ठरवल्यास ते मला पाठिंबा देतील. जर मी माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते, तर मी मुलाचीही काळजी घेऊ शकते. यासाठी पतीवर अवलंबून राहणं गरजेचं नाही. समाज पुढे येत आहे आणि अशा बाबी स्वीकारत आहे. आम्ही शो बिझनेसमध्ये असल्यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा लक्ष ठेवले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की मनोरंजन उद्योग बदल घडवून आणत आहे, परंतु त्याच्या बाहेरही स्वीकृती आहे. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत, पण ते इंडस्ट्रीमध्ये नाहीत, त्यामुळे हेडलाइन्स येत नाहीत”.
आणखी वाचा – वयाच्या ५९व्या साली आमिर खान प्रेमात?, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, कुटुंबासह भेटही घडवली अन्…
टीना दत्ता अलीकडेच मुंबईच्या जिम संस्कृतीवर आधारित ‘पर्सनल ट्रेनर’ या क्राईम-थ्रिलर मालिकेत दिसली होती. ही सीरिज का केली, असं विचारल्यावर टीना म्हणाली, “कथा खूपच आकर्षक होती. ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे आणि इसं काही मी आधी केलं नव्हतं. या सीरिजचे लेखन व दिग्दर्शन माझा मित्र अमित खन्नाने केलं आहे. त्याने ‘सेक्शन 365’ व ‘366’ सारख्या शोसाठी काम केलं आहे. हा प्रोजेक्ट दमदार आहे, याची जाणीव असल्याने काम करायला होकार दिला”. ‘पर्सनल ट्रेनर’ ही सीरिज २३ जानेवारीला हंगामावर प्रदर्शित झाली आहे.