बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘फ्रेंड्स’ फेम प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन, हॉट टबमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 29, 2023 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
'friends' fame actor Matthew Perry dies

'फ्रेंड्स' फेम प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन, हॉट टबमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

नव्व्दच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलर ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. लॉस एंजेलिस येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. लॉस एंजेलिस टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू यांचा मृतदेह त्यांच्या घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही समजू शकले नाही. मॅथ्यू यांच्या निधनाने त्यांचे चाहते व या मालिकेच्या प्रेमींना, तसेच हॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक जण सोशल मीडियाद्वारे आपला शोक व्यक्त करत आहे. (‘friends’ fame actor Matthew Perry dies)

१९ ऑगस्ट १९६९ रोजी रोजी विलियमस्टाउन येथे मॅथ्यू पेरी यांचा जन्म झाला. त्यांची आई सुझान मेरी या पत्रकार होत्या. तर वडील जॉन बेनेट पेरी हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते होते. मात्र ते जेव्हा १ वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. पुढे त्यांच्या आईने पत्रकार कीथ मॉरिसन यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं. ‘चार्ल्स इन चार्ज’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

हे देखील वाचा – “मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांकडे…”, मराठी चित्रपटांच्या सध्याच्या स्थितीबाबत गौरव मोरेची खंत, म्हणाला, “मराठी कलाकारांमध्ये…”

Actor Matthew Perry, who gained fame in the 1990s for his starring role in the hit US television comedy 'Friends', was found dead at age 54 on Saturday in a hot tub at a Los Angeles-area home, reports Reuters quoting LA Times

— ANI (@ANI) October 29, 2023

पुढे ‘बेव्हरली हिल्स ९०२१०’, ‘अ नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रीअर्डन’, ‘फुल्स रश इन’, ‘ऑलमोस्ट हीरोज’, ‘द रॉन क्लार्क स्टोरी’ यांसारख्या अनेक चित्रपट व टीव्ही शोजमध्ये त्यांनी काम केले आहे. मात्र त्यांना ‘फ्रेंड्स’ या टीव्ही शोमधून खरी लोकप्रियता मिळाली. ‘फ्रेंड्स’ या टीव्ही शोमध्ये मॅथ्यू पेरी यांनी चँडलर ही व्यक्तिरेखा साकारली होती. ते या शोचे जवळपास १० वर्ष भाग होते. तसेच, २०२१ मध्ये आलेल्या ‘फ्रेंड्स रियुनियन’ मध्येही ते झळकले होते. मॅथ्यू पेरी हे अभिनेते असण्याबरोबरच विनोदी नट आणि निर्मातेही होते. ‘मिस्टर सनशाइन’ या मालिकेत त्यांनी सह-निर्माता, लेखक व कार्यकारी निर्माता अशी अनेक भूमिका त्यांनी केली होती.

हे देखील वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात बॉयफ्रेंडची एंट्री पाहून ईशा मालवीयाही मोठा धक्का, अभिषेक ढसाढसा रडू लागला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

मॅथ्यू पेरी यांच्या निधनाने संपूर्ण हॉलिवूड सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचबरोबर, ‘फ्रेंड्स’ मालिकेचे चाहते व अनेक कलाकार त्यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त करत आहे.

Tags: 'friends' fame actor Matthew Perry diesfriends tv showhollywood actormatthew perry
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Urmila Kothare talks about her Diwali Celebration

सासूबाईंची साडी नेसून रेड कार्पेटवर आली उर्मिला कोठारे, म्हणाली, "माझ्या सासरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.