Tv Actress Casting Couch : अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर कास्टिंग काऊचबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांना आलेल्या या कास्टिंग काऊचबाबत स्पष्टपणे भाष्य करतात. तर काही कलाकार याबाबत भाष्य करण्यास नकार देतात. सर्व सामान्यांप्रमाणे असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कास्टिंग काऊचची शिकार व्हावं लागलं आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा. क्रिस्टल जवळपास दोन वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. अभिनेत्रीला सर्वाधिक लोकप्रियता ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून मिळाली.
क्रिस्टलनं अलिकडेच झूमला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. यादरम्यान, अभिनेत्रीनं प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं आहे. क्रिस्टलने मुलाखतीदरम्यान मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करतानाचा अनुभव सांगितला आहे. त्यादरम्यान अभिनेत्रीबरोबर एक भयंकर घटना घडलेली. अभिनेत्रीनं सांगितलं की, ती १५ वर्षांची असताना तिच्याबरोबर ही धक्कादायक घटना घडली. क्रिस्टल म्हणाली की, “मी लोकल ट्रेनने कॉलेजला जायचे. माझी अनेकदा छेड काढली गेली आहे”.
आणखी वाचा – जुई गडकरीला सतावतेय पूर्णा आजींची आठवण, खुर्चीचा फोटो शेअर करत म्हणाली, “या खुर्चीवर…”
क्रिस्टल म्हणाली की, “मला आठवतंय की, मी तेव्हा १५ वर्षांची होते. लेडीज डबा थोडा रिकामी होता. त्यात एक पुरुष शिरला आणि त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा हात धरला आणि त्याला बाहेर ढकललं. हे कसं घडलं माहित नाही आणि मी नंतर थरथर कापत होते. मी खूप वाईट स्थितीत होते आणि इतर महिलांनी मला शांत होण्यास मदत केली”, असं क्रिस्टलने पुढे सांगितलं.
क्रिस्टलने सांगितलं की तिला यातून बरं होण्यासाठी खूप वेळ लागला. यानंतर तिनं लोकल ट्रेननं प्रवास करणंही बंद केलं. क्रिस्टल पुढे म्हणाली की, “मला वाटतं की जेव्हा दिवसाढवळ्या एखाद्या महिलेबरोबर असं घडू शकतं, तेव्हा रात्री महिला किती सुरक्षित असतील”.





