बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बघ की इकडे…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीची भररस्त्यात छेड काढली आणि…; घाणेरड्या कृत्याबाबत म्हणाली, “शिट्ट्या वाजवत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 4, 2025 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Navri Mile Hitlerla fame Actress news

"बघ की इकडे…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीची भररस्त्यात छेड काढली आणि…; घाणेरड्या कृत्याबाबत म्हणाली, "शिट्ट्या वाजवत…"

Navri Mile Hitlerla fame Actress news : रस्त्यावरुन जात असताना मुलींची छेडछाड होण्याच्या अनेक घटना घडतात. मुलींना पाहून मोठ मोठ्याने गाणी म्हणणे, विचित्र हावभाव करणे किंवा इतर अनेक गोष्टी सर्रासपणे दिवसाढवळ्या होताना दिसतात. याबाबत अनेकजण आवाज उठवतात तर काही महिला लाजेने या गोष्टींवर भाष्य करत नाहीत वा दुर्लक्ष करतात. तर अशीच एक घटना ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील अभिनेत्री आलापिनीबरोबर घडल्याचे समोर आले आहे. बऱ्याचदा या घटना समोर येत नाहीत, पण काही मुली न घाबरता अशा घटनांबद्दल जाहिरपणे बोलताना दिसतात.

अभिनेत्री आलापिनी निसळने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, “३ दुचाकी, ६ मुले, रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत होते आणि ते एकमेकांशी बोलत होते, मी त्यांना ओव्हरटेक केला. ती मुले गाड्यांचे हॉर्न वाजवत होते. ‘बघ की इकडे, ए पाव्हणी’, असे ते मोठमोठ्याने म्हणत होते आणि शिट्ट्या वाजवत होते. मी वळले तेव्हा ते अशा पद्धतीने पुढे गेले की जणू काही घडलेच नाही”.

आणखी वाचा – उमेश कामतचा नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, प्रिया मोदक करताना दिसली स्वयंपाकघराची झलक, हॉलही आहे प्रशस्त

अभिनेत्रीने पुढे लिहिले, “मी घरी आले, बाप्पाच्या शेजारी बसले मला माहीत नाही मी तिथे किती वेळ बसले होते”. असे लिहित आलापिनीने घडलेली घटना सांगितली. आलापिनी निसळ ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून अभिनेत्री घराघरात पोहोचली. तिने या मालिकेत रेवतीची भूमिका साकारली होती. मालिका संपल्यानंतरही अभिनेत्री आलापिनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिच्या नृत्य सादरीकरणाच्या व्हिडीओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते.

आणखी वाचा – राहुल देशपांडेनंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नाच्या पाच वर्षातच संसार मोडला, पतीने शेअर करत दिली माहिती

आलापिनीचे वल्लरी विराजबरोबरचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना ही दिसतात. आलापिनीबरोबर भर गणेशेत्सवात घडलेली ही विचित्र घटना अर्थातच लाजिरवाणी आहे. असे वाईट वागणाऱ्यांना योग्य ती शिक्षा नक्कीच मिळायला हवी. तेव्हाच एखादी मुलगी बिनधास्त घराबाहेर पडू शकते.

Tags: bad languagemarathi actressNavri Mile Hitlerla
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Jyoti Chandekar death

जुई गडकरीला सतावतेय पूर्णा आजींची आठवण, खुर्चीचा फोटो शेअर करत म्हणाली, "या खुर्चीवर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.