शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ हिंदू अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानमध्ये उपवास करण्यावरुन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “नवरात्रीतही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 19, 2024 | 10:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dipika Kakar Ibrahim Trolled

'या' हिंदू अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानमध्ये उपवास करण्यावरुन ट्रोल, नेटकरी म्हणाले, "नवरात्रीतही…"

‘ससुराल सिमर’ या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम घराघरांत पोहोचली. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. तिने अभिनेता शोएब इब्राहिमसह लग्न केले आहे. शोएबसह लग्न केल्यानंतर दीपिकाने धर्म बदलला. तिने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. शोएब व दीपिकाच्या लग्नाच्या पत्रिकेवरही अभिनेत्रीचे नाव फैजा असे लिहिले होते. त्यावेळी धर्म बदलल्यामुळे दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. (Dipika Kakar Ibrahim Trolled)

शोएबबरोबरच्या लग्नानंतर दीपिकाही रमझानचे उपवास ठेवू लागली आहे. या दिवसांतही ती रमजानमध्ये उपवास करत आहे. इफ्तारीच्या तयारीची झलक दीपिका व्हिडीओद्वारे चाहत्यांशी शेअर करत असते. मात्र, यामुळे दीपिकालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, “दीपिकाने तिचे नाव बदलून फैजा ठेवावे, ती दोन्ही धर्मांची खिल्ली उडवत आहे”.

आणखी वाचा – अखेर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला प्रसाद ओकने दिली पार्टी, नवीन घरात केला पाहुणचार, म्हणाला, “रसिकांनी या घटनेची…”

View this post on Instagram

A post shared by Dipika Kakkar ???? (@dipika_kakkar.official)

तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, “नवरात्रीही येत आहे मॅडम, उपवास ठेवण्यासाठी तयार रहा. आणि जसे तुम्ही उपवास ठेवता तसे तुमच्या पतीलाही ठेवायला तयार करा”. तर एका युजरने लिहिले आहे की, “दीपिका कुठली आहे हे कस विसरू शकते, तिचं हे वागणं पाहणे अत्यंत धक्कादायक आहे”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “फैजा बेगम एकेकाळी टीव्ही शोची आघाडीची अभिनेत्री होती”. एकाने लिहिले आहे की, “एका जुन्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, मी करवा चौथचा उपवास कधीही ठेवणार नाही. पण तुम्ही उपवासही करत आहात. दुसऱ्याच्या सणाची चेष्टा का करताय?” तर एकाने लिहिले आहे, “आता सगळे तिला फैजा म्हणत आहेत. दीपिका इब्राहिमच्या नावाने ती दोन्ही धर्मांची खिल्ली उडवत आहे”. चाहते अशा अनेक कमेंट करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – नवरा-बायकोची जबरदस्त जुगलबंदी रंगणार, रोहित-जुईलीच्या आवाजातील ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाणं लवकरच येणार

दीपिका आणि शोएबचे लग्न २२ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले होते. हे दाम्पत्य त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. दोघांनाही एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव रुहान असे ठेवले आहे.

Tags: dipika kakar change castDipika Kakar Ibrahim Trolleddipika kakar trollentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Prathamesh Laghate Story

"सासू माँ…", सासू-सासऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश लघाटेच्या हटके शुभेच्छा, एकत्रित फोटो शेअर करत म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.