‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेतील पाठक बाई या भूमिकेमुळे अक्षयाला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील पाठक बाई व राणादा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. ही ऑनस्क्रीन जोडी कालांतराने ऑफस्क्रिनही एकत्र आलेली पाहायला मिळाली. आजवर राणादा व पाठक बाई यांच्यावर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलं आहे. (Akshya Deodhar On Her Father)
अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधर लग्नबंधनात अडकले आहेत. खऱ्या आयुष्यातही एकत्र आलेल्या या जोडीला पाहून प्रेक्षकांना आनंद झाला. लग्नानंतर अक्षयाने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मात्र अक्षया सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. अक्षयाने ही पोस्ट तिच्या वडिलांसाठी शेअर केली आहे. अक्षयाचे वडील भारतीय रेलमध्ये कामाला होते. ४० वर्ष त्यांनी ही नोकरी केली. ४० वर्ष काम केल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. याबाबत अक्षयाने बाबांचा फोटोसह “हॅपी रिटायरमेंट बाबा, भारतीय रेलमध्ये चाळीस वर्ष नोकरी केली. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आता वर्ल्ड टूर” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

अक्षया व तिच्या वडिलांचं बॉण्डिंग घट्ट आहे. नेहमीच ती कुटुंबीयांबरोबरचे फोटो शेअर करत असते. अशातच आता वडिलांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अक्षयाने कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय आता अक्षयाचे बाबा कामातून निवृत्त होताच वर्ल्ड टूर करणार असल्याचंही अभिनेत्रीच्या पोस्टमधून कळतंय. अक्षयाने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. लवकरच अक्षया मोठा पडदा गाजवायला सज्ज होणार आहे. अक्षयचा ‘पील्लू बॅचलर’ हा आगामी चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.