Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका सध्या रोमॅंटिक वळणावर आली आहे. मालिकेत अधिपती व अक्षरा यांच्या हनिमूनचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. हनिमूनसाठी अधिपती व अक्षरा हे थायलंडमध्ये गेले होते आणि याचे काही खास क्षण आता मालिकेत बघायला मिळत आहेत. मालिकेत आता हनिमून स्पेशल भाग पाहायला मिळणार असून अधिपती-अक्षरा यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या हनिमून स्पेशल भागांचे नवीन प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत असून या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचे रोमॅंटिक प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून या प्रोमोंना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)
अशातच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात अधिपती व अक्षरा एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले आहेत. ‘जोगवा’ चित्रपटातील ‘जीव रंगला’ या गाण्यावर या दोघांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. या नावीन प्रोमोसाठी अधिपती-अक्षरा यांनी खासस लूकही केला आहे. अक्षराने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तर अधिपतीने पांढऱ्या रंगाचे शर्ट-पॅंट घातली आहे. प्रेमाला समर्पित असलेल्या लाल व पांढऱ्या रंगावर या दोघांचा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

हा नवीन प्रोमो काहींना आवडला आहे. मात्र काहींच्या हे पसंतीस पडला नाही. ‘तुला शिकवीन…’चा नवीन प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसून अनेकांनी याबद्दल त्यांची मतं कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहेत. या नवीन प्रोमोवर एका नेटकऱ्याने “यांना आवरा, ही मालिका आहे चित्रपट नाही” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “हा इम्रान हाश्मीचा चित्रपट आहे का?” तसंच “गरिबांचा इमरान हाश्मी” असं म्हटलं आहे. तसेच एकाने “ही मालिका घरी टीव्हीवर बघताना बंद करावी लागली, खूप आवडती मालिका होती” तर आणखी एकाने “जरा अतिच दाखवत आहेत. अति तेथे माती हे ध्यानात ठेवा म्हणजे झालं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा आहे, तर अक्षरा ही एका शाळेतील शिक्षिका आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांच्या नवीन केमिस्ट्रीला सुरुवात झाली असून हे केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.