‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या गाण्याच्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका व अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या गायिकांमध्ये केतकीचे नाव घेतले जाते. गायनाबरोबर केतकी उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. गायनाची आवड जपत केतकीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘शाळा’, ‘टाईमपास’, ‘तानी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये केतकीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवाय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती असंख्य तरुणांची क्रशही आहे.
आपल्या गायनाने व अभिनयाने चर्चेत असणारी केतकी माटेगावकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक नवनवीन फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर गाण्याचे काही व्हिडीओही ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. तिच्या या गाण्यांच्या व्हिडीओला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत असतो. तसेच ती अनेकदा सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवरही भाष्य करत असते.

अशातच नुकताच केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रश्नोत्तरांचा सेगमेन्ट केला. यामध्ये तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. मात्र केतकीला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. केतकी गायिका असल्याने ती अनेक भाषेतील गाणी गाते. मात्र तिच्या काही चाहत्यांना हीच गोष्ट खटकते आणि याचमुळे एका चाहत्याने तिला “तू सुरुवातीपासून मराठी गाण्यांना जास्त महत्त्व दिलं आहेस. मग आता इंग्रजी गाणी का गातेस?” असा प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा – आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”
नेटकऱ्याच्या याच प्रश्नाला उत्तर देत केतकीने असं म्हटलं की, “मावशी लाडकी असली तरी आई ही आईच असते. इंग्रजी गाणी का गाते? याचं कारण लककरच कळेल. पण मराठी गाणी म्हणणं कधीच सोडणार नाही”. दरम्यान, केतकीच्या या उत्तरामुळे ती आता इंग्रजी गाणं घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे? की आणखी काही याविषयी तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.