ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी तरुण पिढीतील घटस्फोटाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच आशा यांनी अध्यात्मिक नेते रविशंकर यांच्याशी संभाषण केलं त्यावेळी तिने त्यांना त्यामागील कारण विचारले आणि तरुण जोडप्यांमधील प्रेम इतक्या लवकर कमी होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आशा भोसले यांनी असेही सांगितले की, त्यांच्या पतीबरोबरसमस्या असतानाही त्यांनी त्यांचे लग्न मोडण्याचे कठोर पाऊल कधीही उचलले नाही. (Asha Bhosle Worried About Divorce)
आशा भोसले म्हणाल्या, “माझ्या पतीबरोबरही अडचणी होत्या पण मी माझ्या पतीला कधीही घटस्फोट दिला नाही. तथापि, आजकाल, मी दर महिन्याला जोडप्यांना घटस्फोटाची कागदपत्रे पाठवल्याबद्दल ऐकतेय. असे का होत आहे गुरुदेव?”. “मी माझी बरीच वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालवली आहेत आणि अनेक लोकांना पाहिले आहे, परंतु याआधी त्यांनी कधीही एवढी कठोर पावले उचलली नाहीत जी सध्याची पिढी करत आहे. मला वाटतं त्यांच्यामधलं प्रेम लवकरच नाहीसं होत आहे आणि त्यांना एकमेकांचा लवकर कंटाळाही येतो. कदाचित हे सर्वात मोठे कारण आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सूरजच्या सहानुभूतीवर पुढे गेलीस”, निक्कीने अंकिताला टोकलं, म्हणाली, “घाण गेम खेळत…”
रविशंकर म्हणाले की, “आजकाल आकर्षण हे प्रेमापेक्षा जास्त असते. तरुण जोडप्यांमध्ये सहनशीलतेची पातळी नसल्यामुळे त्यांच्यातील समस्या सुटत नाहीत”, असा युक्तिवादही त्यांनी केला. ते म्हणाले, “तू गात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. तुमची देवावर श्रद्धा होती. त्रास सहन करण्याची आणि त्यांना सामोरे जाण्याची ताकदही तुमच्यात होती”. उल्लेखनीय आहे की, आशा भोसले त्यांची बहीण लता मंगेशकर यांचे सचिव ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याबरोबर 16 वर्षांच्या असताना पळून गेल्या होत्या. त्यांनी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आणि त्यांना तीन मुले झाली. मात्र, १९६० मध्ये हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर आशाने १९८० मध्ये आरडी बर्मन यांच्याशी लग्न केले आणि १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले.
आशा भोसले यांनी ‘रंगीला’ची गाणी गात सिनेविश्वात पुनरागमन केले. वयाच्या ७९ व्या वर्षी तिने २०१३ मध्ये माई या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गायनाबरोबरच या दिग्गज गायिकेला स्वयंपाकाचीही आवड आहे. तिने तिच्या छंदाचे करिअरमध्ये रुपांतरही केले आहे आणि ती जगभरातील मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट चालवते.