रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षरा पुन्हा सासरी जाणार, अधिपतीबरोबर नव्याने संसार थाटताना भुवनेश्वरी अडथळा निर्माण करणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2025 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada daily updates akshara will go her in-laws again on the occasion of Makar Sankranti new promo viral

अक्षरा मकरसंक्रांतीनिमित्त पुन्हा आपल्या सासरी जाणार, नवीन प्रोमो समोर

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही झी मराठीवरील मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपती यांच्याशिवाय भुवनेश्वरीची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. अक्षरा सुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.  (tula shikvin changlach dhada daily updates)

मालिकेत एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे त्यांचा अबोलाही पाहायला मिळत आहे. दोघांमधील या चुकीच्या संवादामुळे दोघांमधील गैरसमज आणखीनच वाढत आहेत. अशातच आता अक्षरा लवकरच तिच्या सासरी जाणार आहे. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर अक्षरा सासरी जाण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता मालिकेच्या कथानकाला एक वेगळं वळण आलं आहे. आणि याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. झी मराठीने हा नवीन प्रोमो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अर्जुन बिजलानीच्या आई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार, तब्येत खालावल्यानंतर अभिनेता भावुक

या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा असं म्हणते की, “मी लवकरच घरी परत जाईन. तिळगूळ घेऊन जाईन. संक्रांतीच्या मुहूर्तावर मी आता त्या घरात जाईन”. यावर तिचे वडील “कशासाठी?” असं विचारतात. त्यानंतर अक्षरा त्यांना उत्तर देत म्हणते की, “अधिपतींना भेटण्यासाठी”. तर एकीकडे भुवनेश्वरी तिच्या बहिणीला मकरसंक्रांतीची तयारी करायला सांगत आहे. भोगीसाठी भाजी आणावी यंदा तीळाचे लाडू जरा जास्त आणावेत असंही सांगते.

आणखी वाचा – क्रांती रेडकर व समीर वानखेडेंच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण, नवऱ्यासाठी शेअर केली सुखद पोस्ट, म्हणाली, “सर्व चढ-उतारांसह…”

त्यामुळे आता अधिपती व भुवनेश्वरीच्या अप्रत्यक्ष व अक्षरा घरात येणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. तसंच यामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्यातीळ नाते पुन्हा पूर्वपदावर येणार का?, मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अधिपती-अक्षरा हे दोघे आपापसातील मतभेद, भांडण विसरुन पुन्हा एकत्र येणार का? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.   

Tags: tula shikvin changlach dhada daily updatestula shikwin changlach dhada serial updatetula shikwin changlach dhada today episode
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Oscars 2025 

ऑस्कर २०२५ रद्द होणार?, ९६ वर्षात प्रथमच पुरस्कार सोहळा रद्द होण्याची शक्यता, लॉस एंजेलिसच्या आगीचा मोठा फटका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.