‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही झी मराठीवरील मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेमाचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. नुकतीच अक्षराने अधीपतीला तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच मालिकेच्या प्रेमात पडत आहेत.
नुकतीच अक्षराने अधिपतीकडे तिला वाटत असलेल्या भावना व्यक्त केल्या. अक्षराने अधिपतीच्या खास अंदाजात त्याला प्रेमाची मागणी घातली. या नवीन ट्विस्टला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. अशातच आता अधिपती-अक्षरा यांच्या फुलणाऱ्या प्रेमाचे चित्रण आणखी एक नवीन व्हिडीओ झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या नवीन व्हिडीओमध्ये अधिपती व अक्षरा यांच्यातील गोड क्षण पाहायला मिळत आहेत.
अक्षरा-अधिपतीमधील ही जवळीक आता आणखी वाढणार आहे. या मालिकेचे पडद्यामागील काही खास व्हिडीओ समोर आले असून या व्हिडीओमध्ये अधिपती व अक्षरा यांच्या घरातील पलंग सजवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या पलंगाचबरोबर त्यांची खोलीही फुग्यांनी सजवली असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लाल फुगे व लाल गुलाबांनी सजावट करण्यात अली आहे. पलंग सजवल्यामुळे आता अधिपती व अक्षरा यांच्यात हनिमून होणार आहे की काय? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, मालिकेत अधिपती व अक्षरा यांच्यातील ही वाढती जवळीक प्रेक्षकांना आवडत असली तरी भुवनेश्वरी मात्र त्यांच्या या नात्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न करत आहे. अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेमात आता भुवनेश्वरी मिठाचा खडा टाकणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.