शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’मधील अधिपती वर्षभरापूर्वी झाला बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर घेतला होता निर्णय, इतकी गोंडस आहे लेक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 22, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hrishikesh Shelar Daughter

'तुला शिकवीन…'मधील अधिपती वर्षभरापूर्वी झाला बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर घेतला होता निर्णय, इतकी गोंडस आहे लेक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेला विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अक्षरा व अधिपतीची प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. मालिकेत अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे तर अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता हृषीकेश शेलार पाहायला मिळत आहे. शिवानी व हृषीकेशवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. त्यामुळे या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. अधिपतीच्या खऱ्या आयुष्याबाबत बोलायचं झालं तर नेहमीच तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. (Hrishikesh Shelar Daughter)

सहा वर्षांपूर्वी हृषीकेश खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकला. त्याने नेहासह लग्नगाठ बांधली. वर्षभरापूर्वी अभिनेता ऋषिकेश शेलार आणि नेहा आई बाबा झाले. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. मुलीच्या जन्मानंतर अभिनेता खूप खुश असलेला दिसला. मोठ्या दणक्यात त्यांनी त्यांच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पाडला. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या कलाकारांची संपूर्ण टीम ऋषिकेशच्या मुलीच्या बारश्याला पोहोचली होती. हृषीकेशने त्याच्या लेकीचं नाव रुही असं ठेवलं आहे.

आणखी वाचा – पारू आणि हरीशचं लग्न?, अहिल्यादेवींच्या शब्दाखातर देणार का लग्नाला होकार?, मालिकेत येणार नवं वळण

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Shelar (@hrishishelar)

सोशल मीडियावरही हृषीकेश बऱ्यापैकी सक्रिय असतो. तो नेहमीच त्याच्या मुलीचे फोटो शेअर करत असतो. या फोटोंमध्ये हृषीकेशची लेक खूपच क्युट आणि नाजूक दिसत आहे. हृषीकेश त्याच्या गोंडस लेकीचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. चाहतेही त्यांच्या या फोटोंवर लाईक्स व कमेंटचा वर्षाव करताना दिसतात.

आणखी वाचा – भारती सिंहने खाल्ला २४ कॅरेट सोन्याने तयार केलेला पदार्थ, इतकं महाग होते प्रत्येक पदार्थ, म्हणाली, “आता लाज वाटते कारण…”

लेकीच्या जन्मानंतर ऋषिकेश आणि नेहा प्रचंड खुश आहेत. नेहा सध्या लेकीची काळजी घेत आहे. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, रूहीचं पाऊल घरात पडले आणि माझं आयुष्य बदलून गेलं. मला झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये पहिल्यांदाच नायकाची भूमिका साकारायला मिळाली.” असं सांगत लाडक्या लेकीला ऋषिकेशने त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेयही दिलं आहे.

Tags: hrishikesh shelarHrishikesh Shelar Daughterhrishikesh shelar familyTula shikvin Changalach Dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ira khan and Nupur Shikhare Home

Video : आमिर खानच्या लेकीचं असं आहे सासरकडचं घर, अगदी साधं आहे राहणीमान, नवऱ्यासह कसं जगत आहे आयुष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.