बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आमिर खानच्या लेकीचं असं आहे सासरकडचं घर, अगदी साधं आहे राहणीमान, नवऱ्यासह कसं जगत आहे आयुष्य?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 22, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Ira khan and Nupur Shikhare Home

Video : आमिर खानच्या लेकीचं असं आहे सासरकडचं घर, अगदी साधं आहे राहणीमान, नवऱ्यासह कसं जगत आहे आयुष्य?

आमिर खानची लाडकी लेक आयरा खान नेहमीच चर्चेत असते. इतकंच नव्हेतर संपूर्ण खान कुटुंबही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेलं पाहायला मिळतं. आयरा खान मात्र आजवर इतर स्टार किड्सप्रमाणे आलिशान जीवनशैली पासून दूर राहिली. परदेश दौरा, आलिशान राजवाड्यासारखे घर आणि शाही थाटामाट, उच्च राहणीमान असं आलिशान जीवन आमिर खानच्या लेकीने जगलं नाही. मात्र आता लग्नानंतरही आयराने साधे जीवन जगण्याकडे अधिक भर दिलेला पाहायला मिळत आहे. लग्नानंतरही ती साधे जीवन जगत आहे आणि ज्यात ती आनंदी आहे. (Ira khan and Nupur Shikhare Home)

आयराने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर लग्न केले. मुंबई आणि त्यानंतर राजस्थानमध्ये झालेल्या या भव्य लग्नाचे फोटो व व्हिडीओ स्पशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर आयरा नुपूरबरोबर त्याच्या जुन्या घरात राहत आहे. आमिर खानचे आलिशान घर सोडून, ​​सुपरस्टारच्या मुलीकडे आता नुपूरच्या मालकीची एक छोटी खोली असलेली पाहायला मिळत आहे. नुपूर आणि त्याची आई अनेकदा त्यांच्या घराचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. हे व्हिडीओ पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, आयराने नुपूरशी लग्न त्याचे राहणीमान वा जीवनशैलीमुळे नाही तर खास नात्यामुळे केले आहे.

आणखी वाचा -“७५ पेक्षा जास्त वय असूनही…”, बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, “या वयात…”

View this post on Instagram

A post shared by Nupur Shikhare (@nupur_popeye)

आयरा आणि नुपूरची बेडरूम खूप साधी आणि सिंपल आहे. दोघांनाही दिखाऊ आयुष्यापेक्षा साधेपणा जास्त आवडतो. या खोलीत दोघेही आनंदाने आपले जीवन जगत आहेत. नुपूर अनेकदा बाथरूमच्या आरशात पाहून व्हिडीओ बनवत असतो. यांत त्याच्या काचेच्या आणि छोट्या, सुंदर बाथरूमची झलक पाहायला मिळते. नूपुरची डान्सर आई अनेकदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. बरेचदा ते स्वयंपाकघरातूनही व्हिडीओ शेअर करतात. या त्याच्या स्वयंपाकघरात लाकडी कपाट पाहायला मिळतंय. तर त्यांच्या फ्रिजवर बरेच स्टिकर चिकटवलेले दिसत आहेत.

आणखी वाचा – “गडकिल्ल्यावर बाई कधीच नाचली नाही”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “जाहीर निषेध कारण…”

View this post on Instagram

A post shared by Nupur Shikhare (@nupur_popeye)

नुपूरच्या आईने सुष्मिता सेनसारख्या अभिनेत्रींना नृत्य शिकवले आहे. ती त्यांच्या घरातील हॉलमधून डान्सचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करते. यावेळी त्यांच्या सुंदर आणि भव्य अशा हॉलची झलकही पाहायला मिळते. आयरा कोरोनाच्या काळात नुपूरच्या फिटनेस क्लासमध्ये सहभागी झाली होती. या ऑनलाइन क्लासदरम्यान दोघेही प्रेमात पडले. गेल्या वर्षी त्यांनी त्यांचा साखरपुडा सोहळा उरकला. त्यानंतर त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्नसोहळा उरकला. सध्या दोघेही त्यांच्या संसारात सुखी आहेत आणि काम करत आहेत.

Tags: aamir khan daughterentertainmentIra khan and Nupur ShikhareIra khan and Nupur Shikhare HomeIra khan and Nupur Shikhare lifestyle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Shark Tank India Judge Anupam Mittal

अमेरिकेतील नोकरी गमावली, कर्ज अन्…; 'शार्क टँक'चे जज अनुपम मित्तल यांची काही वर्षांपूर्वी इतकी बिकट होती परिस्थिती, स्वतःच केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.