झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरांत पोहीचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे सर्वांचे लाडके राणादा व अंजली, म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही ही जोडी सर्वत्र लोकप्रिय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठदेखील बांधली. हार्दिक-अक्षया हे दोघे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Hardik Joshi and Akshaya Devdhar Devdarshan)
सोशल मीडियावर सक्रिय असणारे हार्दिक-अक्षया त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना प्रसंगे किंवा काही खास अनुभव आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच त्यांनी देवदर्शनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर श्रर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे देवीच्या दर्शनाला पोहोचले आहेत. तसंच यावेळी हार्दिकने खांद्यावर पालखीदेखील घेतली होती. त्यानंतर अक्षयाने देवीची पूजाही केली. त्याचबरोबर नंतर दोघांनी एकत्र दर्शनही घेतलं.
हार्दिक-अक्षया यांनी सोशल मीडियावर हा देवीच्या दर्शनाचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “हे आई जगदंब… नादंबा देवी मातेचा विजय असो”. सोशल मीडियावर हार्दिक-जोशी यांच्या देवदर्शनाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “जय हो”, “आई राजा उदो उदो”, “धन्यवाद आपण गावाचा मान राखलात” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – 14 January Horoscope : मकर संक्रांतीच्या दिवशी ‘या’ राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या
दरम्यान, दोघांघ्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अक्षया देवधर सध्या झी मराठीवरीलच लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं नाव भावना असं आहे. तर हार्दिक सध्या मनोरंजन विश्वापासून काहीसा दूर आहे. मात्र तो सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं