गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

थकलेलं शरीर, कमी झोप आणि…; सततच्या शूटिंगने अभिनेत्याची वाईट अवस्था, म्हणाला, “धावपळीचा आठवडा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2025 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 abhijit amkar shares post

थकलेलं शरीर, कमी झोप आणि...; सततच्या शूटिंगने अभिनेत्याची वाईट अवस्था, म्हणाला, "धावपळीचा आठवडा..."

 abhijit amkar shares post : मालिकाविश्वातील कथानक हे प्रेक्षकांचं भरभरुन मनोजनं करत आलं आहे आणि करत आहे. या मालिकांमुळे कलाकारांना नेहमीच प्रसिद्धी मिळते. मात्र एवढी लोकप्रियता मिळवण्यासाठी कलाकारांनाही तेवढीच मेहनत करावी लागते. मालिकेचा एक भाग २५ ते ३० मिनिटांचा असतो. पण तोच भाग चित्रीकरण करण्यासाठी अनेक तास व दिवस लागतात. यामागे कलाकारांची खूप मेहनत असते. दिवस-रात्र, ऊन-वारा, पाऊस काहीही न पाहता ही कलाकार मंडळी घरापासून, कुटुंबापासून दूर राहत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. यांत बरेचदा या कलाकारांना बरं नसतं, मात्र आपल्यामुळे शूटिंग थांबू नये वा इतर टीमची हेळसांड होऊ नये म्हणून उपचार घेत हे कलाकार शूटिंगला हजेरी लावतात.

मालिकाविश्वातील टीआरपीच्या शर्यतीत राहण्यासाठी कलाकारांसह संपूर्ण मालिकेच्या टीमला खूप मेहनत करावी लागते. बरेचदा कलाकारांना मालिकेतील विशेष भाग शूट करण्यासाठी पुरेशी झोप मिळत नाही व त्याशिवाय वेळेवर जेवण ही करता येत नाही. अशातच ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतील अर्णवची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित आमकरने याच मालिकेतील मेहनतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेतील मोठ्या ट्विस्टमुळे लग्नाच्या सीनचं शूटिंग सुरु आहे. आणि हे शूटिंग करतानाची त्याची झालेली धावपळ आणि मेहनत त्याने पोस्टमधून शेअर केली आहे.

आणखी वाचा – सुभेदाराच्या सूनेवर खिळल्या नजरा; नेहमीच साडीत दिसणाऱ्या सायलीचा मॉडर्न लूक पाहताच चाहते गोंधळात, म्हणाले, “मालिकेत हाच लूक…”

View this post on Instagram

A post shared by Abhijit Amkar (@abhijit_amkar)

या पोस्टमध्ये अभिजीत म्हणतो, “अरे बापरे… किती धावपळीचा आठवडा होता. खूप गडबड, गोंधळ आणि खूप थकवणारा, पण तरीही तितकाच सुंदर. या लग्नाच्या शूटमध्ये सगळं होतं. अगदी लाइट्स होते, ड्रामा होता आणि खूप कमी झोपही. काही दिवस मी अगदीच गोंधळलेलो होतो, पण अखेर मला माझा सूर सापडला. मालिकेतील सीन, त्यातील भावभावना आणि वास्तविक आयुष्य एकत्र सांभाळत मी मल्टिटास्किंग करीत राहिलो”.

आणखी वाचा – अभिषेक देशमुखकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, मालिकेतील पदार्पणाआधी दिला सल्ला, म्हणाला, “फक्त स्पर्धा…”

पुढे अभिनेत्याने म्हटलं, “हो. खूप थकलो. पण जेव्हा मला मी स्वतःसाठी उभं राहू शकत नाही, असं वाटलं तेव्हा मला मनाला धीर आणि आधार देणारे काही लोक अनपेक्षितरीत्या भेटले. मनाला शांतता मिळाली. खूप भारावून गेलो होतो. जणू देवानंच त्यांना देवदूत म्हणून पाठवलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचच मनापासून आभारी आहे. कृतज्ञ आहे. असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि रोज मालिका पाहत राहा”, असं लिहीत त्याने भावना व्यक्त केल्या.

Tags: abhijit amkarmarathi actorserial shoot
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Shantanu Gangane Post 

'पारू' फेम अभिनेत्याचा मोठा निर्णय, मानधन थकबाकीनंतर मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा मुद्दा समोर; पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.