शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुभेदारांच्या सूनेवर खिळल्या नजरा; नेहमीच साडीत दिसणाऱ्या सायलीचा मॉडर्न लूक पाहताच चाहते गोंधळात, म्हणाले, “मालिकेत हाच लूक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2025 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jui Gadkari Modern Look

सुभेदारांच्या सूनेवर खिळल्या नजरा; नेहमीच साडीत दिसणाऱ्या सायलीचा मॉडर्न लूक पाहताच चाहते गोंधळात, म्हणाले, "मालिकेत हाच लूक…"

Jui Gadkari Modern Look : ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत आघाडीवर असून ही मालिका गेली दोन-अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिका सुरु झाली तेव्हपासून या मालिकेचा प्रेक्षकवर्ग फॅन झाला आहे. या मालिकेच्या कथानकाने आणि जोडीला कलाकारांच्या अभिनयाने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिका अधिक उठावदार केल्या आहेत. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन आहे. त्यांच्यातील प्रेम, रुसवे-फुगवे सगळंच साऱ्यांना आवडू लागलं आहे.

मालिकेत आजवर अनेक ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. यामध्ये सायली-अर्जुन यांच्यातील दुरावा संपून ते एकत्रही आलेले दिसले याने साऱ्यांना आनंद झाला. मालिकेत सायलीने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली. तिचा निरागस स्वभाव साऱ्यांना पटला. इतकंच नाहीतर सायली नेहमीच मालिकेत साडी नेसून सोज्वळ सून म्हणून वावरताना दिसली. आता मात्र, सायलीच्या भूमिकेने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. यांत सायलीचा पूर्णतः लूकच बदललेला दिसत आहे.

आणखी वाचा – अभिषेक देशमुखकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, मालिकेतील पदार्पणाआधी दिला सल्ला, म्हणाला, “फक्त स्पर्धा…”

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

नेहमीच साडीत दिसणारी सायली आता वेस्टर्न अंदाजात दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मालिकेमध्ये सायलीचा मॉडर्न लूक दाखवण्यात आला असून सायलीच्या मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सायली ही भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने नुकतेच तिच्या मालिकेतील नव्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने राखाडी रंगाचा चिकनकरी कुर्ता परिधान केला आहे. ड्रेसवर सूट होतील असे ऑक्सिडाइज मोठे कानातले आणि कडं घातलं आहे. त्याचबरोबर जुईने केसांना कर्ल्स केलंय, त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे स्टनिंग वाटतोय.

आणखी वाचा – फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण?, ‘छबी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, फोटोमागील गूढ उलगडणार

सायलीने अर्थातच हा लूक अर्जुनसाठी केला आहे. सायलीचे हे घायाळ करणारे फोटो समोर आले असून या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करत “साधं आणि सुंदर रूप जुई ताई”, “हाच लूक पुढे असणार आहे ना जुई”, “अप्रतिम लावण्य”, “खूप छान दिसत आहेस”, अशा कमेंट्स केल्या आहेत.

Tags: jui gadkariJui Gadkari Modern Lookmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
 abhijit amkar shares post

थकलेलं शरीर, कमी झोप आणि…; सततच्या शूटिंगने अभिनेत्याची वाईट अवस्था, म्हणाला, "धावपळीचा आठवडा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.