शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिषेक देशमुखकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, मालिकेतील पदार्पणाआधी दिला सल्ला, म्हणाला, “फक्त स्पर्धा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 15, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhishek Deshmukh post

अभिषेक देशमुखकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, मालिकेतील पदार्पणाआधी दिला सल्ला, म्हणाला, "फक्त स्पर्धा…"

Abhishek Deshmukh post : मालिकाविश्वात नवनवीन आणि आशयघन मालिका रसिकांच्या भेटीस येत आहे. यापैकीच एक म्हणजे ‘लपंडाव’. गेल्या काही दिवसांपासून ‘लपंडाव’ या मालिकेची चर्चा सुरु झालेली पाहायला मिळाली. या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. मालिकेत कृतिका देव आणि चेतन वडनेरे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच मालिकेतील अभिनेत्री कृतिका देव हिच्यासाठी तिचा नवरा अभिनेता अभिषेक देशमुखने लिहिलेली खास पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोचं तोंडभरुन कौतुक करणारी खास पोस्ट अभिषेकने लिहिली आहे.

कृतिकाचा नव्या मालिकेतील भूमिकेचा फोटो शेअर करत अभिषेकने म्हटलं आहे की, “कृतिका, नवीन मालिकेसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आजपासून नवीन सुरुवात होत आहे आणि ती चांगलीच होणार. अगदी लहानपणापासून तू नृत्य शिकलीस, अभिनय केलास, तुझं कलेवरचं प्रेम, श्रद्धा, आत्मियता सिद्ध केलीस, पुढेही करशील. आयुष्यातील कटू आव्हानांना जिद्दीनं तोंड देत एकटीच्या बळावर तू वेगवेगळ्या माध्यमातून काम केलंस,अनेक संधी मिळाल्या, काही हुकल्या. ही संधी आणि संघर्षाचा लपंडाव या क्षेत्रात कोणाला चुकला आहे?. आता टेलिव्हिजन या माध्यमात सुरुवात होत आहे”.

आणखी वाचा – दिवसाढवळ्या प्रायव्हेट पार्ट दाखविला अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह वाईट कृत्य, परदेशात घडली घटना

View this post on Instagram

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)

पुढे त्याने म्हटलं आहे, “हा मालिकेचा प्रवास किती असतो हे कुणालाच ठाऊक नसतं! आणि हीच त्याची गंमत असते. हेही सोपं नसतं पण ते Enjoy करायचं, आपण या प्रवाहाचा आनंद घ्यायचा, कधी नसेल मिळत तर तो शोधायचा. दररोज..! आजपर्यंत तू फक्त स्वतःशी स्पर्धा केलीस आणि पुढे आलीस. आताही तेच करशील याची खात्री आहे. Proud of you! खूप खूप आदर आणि भरभरुन प्रेम”.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या दीड वर्षांनी दिली गुडन्यूज, बेबीबंपसह फोटो समोर

यावर कृतिकानेही भावुक कमेंट करत म्हटलं, “इतकं छान कधी कोणी लिहीतं का? Thank you would be an understatement!! तुला तर सगळंच माहित आहे”. बायकोच्या मालिकाविश्वातील पदार्पणानंतर अभिनेत्याने तिचं कौतुक करत तिला प्रोत्साहन दिलं आहे. आजपासून म्हणजेच १५ सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ ही मालिका प्रदर्शित होत आहे.

Tags: abhishek deshmukhkrutika deomarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
Marathi Movie Chabbi Trailer

फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण?, 'छबी' चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, फोटोमागील गूढ उलगडणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.