बॉलिवूडमधील प्रसिद्ध मालिका व चित्रपट निर्माती एकता कपूर नेहमी वेगवेगळे व बोल्ड विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आतापर्यंत तिने केलेल्या मालिका व चित्रपट हे चर्चेचा विषय बनले आहेत. काही वर्षांपूर्वी तिचा ‘लव्ह,सेक्स और धोका’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये एक तृतीयपंथी पात्र महत्त्वाचं दिसत आहे. (Transwomen bonita rajpurohit movie)
‘बालाजी मोशन पिक्चर्स’ने या चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ट्रान्सवुमन बोनिता राजपुरोहित महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये बोनिता आपला संघर्ष सांगत आहे. ती म्हणत आहे की, “मी स्वतःबद्दल चित्रपटांमधून शिकले. जेव्हा मी माझ्यासारख्या व्यक्तीला चित्रपटामध्ये पहायचे तेव्हा मला ती माझ्यासारखीच वाटायची. माझ्यासारख्या महिलांना मोठ्या पडद्यावर पहाणं ही माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मी स्वतः अभिनय करेन असे मला कधीच वाटलं नव्हतं. पण यामध्ये मी मुख्य भूमिका साकारणार आहे. खरच आपली स्वप्न पूर्ण होतात”.
तिला चित्रपटांमध्ये काम करण्याआधी काय करायचे असे विचारले असता तिने सांगितले की, “मी आधी प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करायचे. तिथे मला महिना १० ते १५ हजार रुपये मिळायचे. पण ते पैसे पुरेसे नसायचे . या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मला दीबाकर बॅनर्जी यांनी अभिनयाचे धडे दिले”, असेही तिने सांगितले.
तसेच “या चित्रपटामध्ये मला स्वतःचीच भूमिका करायची आहे. माझ्या जगण्यामध्य जया समस्या आहेत, जो संघर्ष आहे त्याबद्दलच मला व्यक्त व्हायचे आहे”, असेही तिने सांगितले. दरम्यान या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अनु मलिक, तुषार कपूर, सोफी चौधरी,मौनी रॉय व इतर काही कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.