शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Pushpa 2 Teaser : साडी नेसून रौद्र रुप, हटके स्वॅग अन्…; ‘पुष्पा २’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 8, 2024 | 1:29 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Pushpa 2 Teaser out

Pushpa 2 Teaser : साडी नेसून रौद्र रुप, हटके स्वॅग अन्…; ‘पुष्पा २’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याने प्रेक्षकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पुष्पा२ : द रुल’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टिझर प्रदर्शित होताच लाखों व्हियु मिळाले आहेत. १ मिनिटे ८ सेकंदांचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येताच अल्लूच्या चाहत्यांनी अक्षरश: प्रेमाचा वर्षाव केला आहे. ग्रँड व्हिज्युअल्स, वायब्रंट कलर्स व बॅकग्राऊंडला असणाऱ्या ‘जथारा’ सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. दुसऱ्या भागामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Pushpa 2 Teaser out)

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी त्याने या लूकमधील एक फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तोच लूक आता टीझरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यामध्ये अल्लू अर्जुन भरजरी साडी, दागिने, गळ्यामध्ये लिंबाची माळ,कानात मोठे झुमके, पायात घुंगरू आणि हातात त्रिशूळ दिसून येत आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांना तोंडात बोटं घालायला लावणारा आहे. यामध्ये तो सर्वांशी मारामारी करताना दिसत आहे. तसेच मागे वाजत असलेले म्युजिक यामुळे अंगावर काटा उभा राहत आहे.

आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या नात्यात दुरावा?, मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, ‘बिग बॉस’ फेम ‘ही’ अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?

यामध्ये ‘जथारा’ म्हणजेच त्याला ‘समक्का सरलम्मा जथारा’ म्हणूनही ओळखले जाते. हा हिंदू आदिवासी देवींसाठी हा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा तेलंगणा राज्यांमध्ये साजरा करतात. या सोहळ्यासाठी १० लाखांपेक्षा अधिक भाविक ४ दिवसीय सोहळ्यामध्ये सामिल होतात.

आणखी वाचा – Video : केसात गजरा, चंद्रकोर, पैठणी साडी अन्…; कार्यक्रमात मराठीमध्ये बोलू लागल्या नीता अंबानी, मराठमोळ्या लूकचं कौतुक, पाहा व्हिडीओ

टिझर येण्याआधी अल्लू अर्जुनने आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. “८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी टिझर प्रदर्शित होईल”, असे कॅप्शन लिहिले होते. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड दिसत आहे. तसेच तो एका सिंहासनावर विराजमान झालेला दिसून येत आहे.  

२०२१ साली ‘पुष्पा’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये लाल चंदनाची तस्करी करताना दिसत आहे. तसेच यामध्ये पुष्पराज व श्रीवल्लीची केमेस्ट्री दाखवण्यात आली आहे. यामध्ये कौटुंबिक कलहदेखील दिसून आले होते. तसेच चित्रपटाच्या शेवटी खलनायक शेखावतबरोबर झालेल्या मारमारीने पेक्षकांचे अधिक लक्ष वेधले होते. आता दुसऱ्या भागात पुष्पाचे नवीन व रौद्ररुप पाहायला मिळणार आहे.

Tags: allu arjunpushpa 2 teaser outsouth movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Kiran Rao On Aamir khan

"लग्नानंतर महिलांवर अत्याचार…", आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मोठं विधान, किरण राव म्हणाली, "आमिर आणि मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.