OMG 2 Trailer : अक्षय कुमार हे नाव बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. अक्षय कुमारचे वर्षाकाठी बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘खट्टा मिटा’ अशा अनेक विनोदी तर अनेक ऍक्शनपट चित्रपटातून अक्षयने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या अक्षय कुमार चर्चेत आहे त्याच्या आगामी ‘ओह माय गॉड’ या चित्रपटांच्या दुसऱ्या भागासाठी. काही दिवसांपूर्वी चित्रपटांच्या काही दृश्यांवर प्रेक्षकांकडून आक्षेप घेण्यात आले होते परंतु सेन्सर बोर्डाकडून कोणतीही मोठी ऍक्शन न घेता चित्रपटाला मान्यता देण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच देखील करण्यात आलं आहे. अक्षय कुमार सह या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठी, अभिनेत्री यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अडचणीत सापडलेल्या मुलाला संकटातून बाहेर काढणारा बाप म्हणून पंकज त्रिपाठी आणि त्यासाठी भगवान शंकराचा अवतार असलेला म्हणून असणारा अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका दिसत आहेत. तर अभिनेत्री यामी गौतम चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसून येत आहे. चित्रपटातील अक्षय कुमारचा लुक प्रेक्षकांच्या देखील चांगलाच पसंतीस उतरत आहे शिवाय पंकज त्रिपाठी यांच्या अभियानचे देखील कौतुक केलं जातंय. ‘ओएमजी २’ चित्रपटाच्या ट्रेलर १ तासात तब्बल १.७ मिलियन पेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.(akshay kumar omg 2 look)
२ ऑगस्ट ही चित्रपटाच्या ट्रेलर लाँचची आधीची तारीख होती मात्र नितीन देसाई यांच्या निधनामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि ३ ऑगस्ट रोजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आली. दिनांक ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांना त्याच्या जवळच्या चित्रपट गृहात पाहता येणार आहे. याआधी चित्रपटात अक्षय कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र ट्रेलर नुसार भगवान शंकर नाही तर शंकराच्या देवदूताची भूमिका अक्षय साकार असल्याचं समजतंय.(omg 2 release date)
हे देखील वाचा – अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ सिनेमा केवळ प्रौढांनाच पाहता येणार ! सेन्सॉर बोर्डाचे आदेश
ओह माय गॉड या चित्रपटाचा पहिला भाग देखील चांगलाच हिट ठरला होता. त्या भागात अभिनेता अक्षय कुमार हा बघावं श्री कृष्णाच्या रूपात अवतरून आपला भक्ताला मदत करतो असं दाखवण्यात आलं होतं. पहिल्या भागात अक्षय कुमार समवेत अभिनेते परेश रावल हे मुख्य भूमिकेत होते.(omg 2 movie)