दैनंदिन राशिभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक व वार्षिक राशिभविष्य हे अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब व मित्रांबरोबरचे संबंध, आपले आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे राशीभविष्य, (सोमवार ०६ मार्च २०२४) या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार तर कोणाला आजचा दिवस शुभ किंवा अशुभ ठरणार?, जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष : कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्रबल उत्तम आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा.
मिथुन : आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क : शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश मिळेल. कुटुंबाची साथ लाभेल. प्रवास केल्यास लाभदायक होतील. व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील.
सिंह : नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गातील उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल.
आणखी वाचा – लग्नाआधी हळद का लावली जाते?, नवरी मुलीच्या हातावर मेहंदी का काढतात?, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं
कन्या : आज धनप्राप्ती, धनलाभ आर्थिक उत्कर्ष उत्पनात वाढीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम दिनमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. मन प्रसन्न राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. मनस्वास्थ संभाळणे गरजेचे आहे.
तूळ : आजचा दिवस काहीसा परीक्षा घेणारा आहे. प्रतिकूलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल.
वृश्चिक : आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. व्यावसायिक भागीदाराबरोबर नवीन व्यापाराचा प्रारंभ अनुकुल राहिल. कामाप्रती सजग रहा. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणाशी संबंधित कामासाठी धावपळ करावी लागू शकते.
धनु : आज मध्यम स्वरूपाचे दिनमान राहील. वादविवाद होण्याची शक्यता आहे. शत्रु वरचढपणा करण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवून रहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे.
मकर : रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम राहील. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. वाहन घर खरेदीस आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम राहील. प्रवासातून लाभ होईल.
कुंभ : कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा. वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आजच्या दिवशी आकस्मिक लाभाचा योग आहे.
मीन : कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. वादविवाद व गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. प्रकृतीकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.