छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही सक्षम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. छोटा पडदा, मोठा पडदा यासह अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी युट्यूबवरही पदार्पण केलं आहे.
तितीक्षा तावडे तिच्या युट्यूबवर चॅनेलवरद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अभिनेत्री तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे तिच्या तिचे रोजचे दैनंदीन अपडेट्स देत असते. युट्यूब चॅनेलद्वारे तितीक्षा तिचे अनेक दैनंदिन व्लॉग व्हिडीओ शेअर करत असते. तिच्याबद्दल जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही आवडते. त्यामुळे तिच्या या व्लॉग व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसून येते.
अशातच तितीक्षा नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी मुंबईतील एका प्रसिद्ध ठिकानाई जाऊन पावभाजीवर ताव मारला. तितीक्षाची सासू म्हणजेच सिद्धार्थ बोडकेची आई व त्याच्या दोन लहान बहिणी नाशिकवरुन मुंबईला आल्यामुळे त्यांना पावभाजी खायला घेऊन जात असल्याचे या व्हिडीओमध्ये तितीक्षा म्हणते. त्यानंतर ते मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणी पावभाजी व मॅंगो मिल्कशेकवर ताव मारतात.
या दरम्यान, तितीक्षा व तिच्या सासूचा खास बॉण्डदेखील दिसून येत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तितीक्षाची सिद्धार्थच्या दोन लहान बहीणींबरोबरची धमाल मजामस्तीसुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईतील या प्रसिद्ध ठिकाणची पावभाजी खाऊन तृप्त झाल्याची भावनाही तितीक्षाने या व्हिडीओमधू व्यक्त केली आहे.
दरम्यान, तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिची ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक उत्कंठावर्धक वळणांमुळे ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.