शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रियासी’ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बॉलिवूड कलाकार गप्प, ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्रीने व्यक्त केला राग, म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
जून 11, 2024 | 10:51 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi fame actress Megha Dhade shared a post being silent on reasi terror attack

'रियासी' दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बॉलिवूड कलाकार गप्प, ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्रीने व्यक्त केला राग, म्हणाली...

९ जून रोजी एकीकडे नव्या सरकारची स्थापना होत असताना दुसरीकडे वैष्णोदेवीच्या भक्तांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळेच हादरले. शिवखोडीहून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, काही दिवसांपासून “All Eyes On Rafah”च्या संदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत होती आणि याच पोस्टशी संबंधित ‘All Eyes On Vaishnodevi Attcak’ व ‘All Eyes On Reasi’ अशा पोस्ट सध्या व्हायरल होतं आहेत.

जम्मूच्या रियासी येथील शिवखोडी येथून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर ‘ऑल आइज ऑन रियासी’ ही पोस्ट ट्रेंड करू लागली आहे. अनेक नेटकरी व मराठीतील अनेक कलाकार मंडळी पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. परंतू, यावर कोणत्याच बॉलिवूड कलाकारांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही आणि याचबद्दल ‘बिग बॉस मराठी’ विजेती मेघा धाडेनेही तिचा राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – राजयोगामुळे मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे अगदीच खास, काय असणार तुमच्या नशिबात?, जाणून घ्या…

मेघा धाडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून तिने बॉलिवूड कलाकारांवर राग व्यक्त केला आहे. बॉलिवूड कलाकार रफाहवर हल्ला झाल्यावर व्यक्त होतात, मात्र देशात दहशतवादी हल्ला झाला तर डोळ्यांवर पट्टी बांधतात अशा आशयाची ही पोस्ट आहे आणि हीच पोस्ट मेघाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माधुरी दीक्षित, वरुन धवण व आयुष्मान खुराणा यांचे फोटो पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – नेत्रा आई होणार असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण, पण ही बातमी विरोचकापर्यंत पोहोचू न देण्याचे घरच्यांचे प्रयत्न, यश मिळणार का?

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील भाविकांना घेऊन ही बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. याचवेळी पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केला. गोळीबारानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५३ आसनी ही बस खोल दरीत कोसळली.

,

Tags: bigg boss marathimegha dhadeReasi Terror Attack Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Noor Malabika Das Family Statement

अभिनेत्रीची गळफास घेत आत्महत्या, मृत्यूनंतर नूर मालबिकाच्या कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, "मोठ्या आशेने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.