सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असतानाच मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तावडे हिचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. तितिक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्याही लग्नसोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नाच्या तसेच लग्नापूर्वीच्या विधींचेही फोटो सोशल मीडियावर वायरल झालेले पाहायला मिळाले. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding)
दोघांनी थेट केळवणाचा फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आणि त्यानंतर ते अखेर लग्नबंधनात अडकले. तितीक्षा व सिद्धार्थच्या साखरपुड्याच्या फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. रोमँटिक पोज देत त्यांनी साखरपुड्याचे खास फोटो शेअर केले होते. तर लग्न सोहळ्यातील त्यांच्या साधेपणानं व पारंपरिक अंदाजाने प्रेक्षकांची मन जिंकली. पारंपरिक लूकमध्ये ही नववधूवाराची जोडी खूपच सुंदर दिसत होती. तितीक्षा व सिद्धार्थ यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नातील खास क्षण शेअर करत आहेत. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – अखेर लग्नबंधनात अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
तितीक्षा व सिद्धार्थ यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांच्यसह त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार धम्माल, डान्स, मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. गाण्यांवर ठेका धरत दमदार डान्स करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ व तितीक्षा यांचा गॉगल लावून एकत्र केलेला डान्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
तर अभिनेत्री रसिका सुनील तिच्या नवऱ्यासह थिरकताना दिसली आहे. इतकंच नव्हे तर तितीक्षाची बहीण खुशबू व तिचा नवरा संग्राम यांचाही डान्स पाहायला मिळाला. शिवाय खुशबूच्या लेकानेही मावशीच्या लग्नात डान्स केला. तर गौरी नलावडे, अनघा अतुल या कलाकारांचा ही धमाकेदार डान्स पाहायला मिळाला. इतकंच नव्हेतर तितीक्षा व सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी ही त्यांच्या लग्नात ठेका धरलेला पाहायला मिळाला. सध्या तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या संगीत सेरेमनीमधील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवलेली पाहायला मिळत आहे.