झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने दोन महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा व सिद्धार्थ यांचा अगदी शाही पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
तितीक्षा-सिद्धार्थ यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच आता दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांचे काही आणखी फोटो शेअर केले आहेत. तितीक्षा-सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला गेले आहेत. लग्नानंतर हे जोडपे कुठे बाहेर फिरायला गेल्याचे पाहायला मिळाले नाही. अशातच आता दोघे गोव्याला फिरायला गेले आहेत.

तितीक्षा-सिद्धार्थ या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ते राहत असलेल्या ठिकाणचा खास फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचाही रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. तितीक्षा-सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढत गोवा इथे फिरायला गेले असून दोघेही एकमेकांबरोबर लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करत आहेत. नुकताच तितीक्षा-सिद्धार्थ यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला होता. तितीक्षाच्या सासरी म्हणजेच नाशिकमध्ये हा सण साजरा केला. याचे खास खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या गोव्यामधील फोटोंनी त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर सिद्धार्थचा लवकरच ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.