रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृण्मयी देशपांडेने पतीसह महाबळेश्वरच्या शेतात थाटला संसार, शेणाने व मातीने स्वत: बांधलं घर, व्हिडीओमध्ये दाखवली संपूर्ण झलक

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 15, 2024 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande shared a video of her small house made by soil and dung in the farm

मृण्मयी देशपांडेने पतीसह महाबळेश्वरच्या शेतात थाटला संसार, शेणाने व मातीने स्वत: बांधलं घर, व्हिडीओमध्ये दाखवली संपूर्ण झलक

‘मोकळा श्वास’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मृन्मयी देशपांडे. मराठी नाटक, मालिका व चित्रपट यातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक जागा निर्माण केली आहे. मृण्मयी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो, बहिणीबरोरचे मजेशीर व्हिडीओ तसेच तिच्या पतीबरोबरचे काही खास फोटोदेखील शेअर करत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या महाबळेश्वरमधील शेतातील घराचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी अभिनयाव्यतिरिक्त शेती करण्यात चांगलीच रमली असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनयातून मोकळा वेळ मिळाला की, ती तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करत असते. ती अनेकदा शेतातले फोटो व व्हिडीओही चाहत्यांसह शेअर करत असते. त्यानंतर आता तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

आणखी वाचा – सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार, मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय, घराबाहेरील सुरक्षा वाढवली

अशातच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी शेतात त्यांचं स्वत: छोटस टुमदार घर बांधलेलं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओद्वारे मृण्मयीने त्यांच्या या घराची छोटीशी झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये मृण्मयीचा पती त्यांच्या या नवीन घराची माहिती देताना दिसत आहे. यात तो माती व शेणाने बांधलेलं घर दाखवत आहे. त्याचबरोबर या घराला अजून दारे-खिडकी लावले नसल्याचेदेखील सांगतो. यानंतर तो त्यांच्या घराची चूल ही पटवतो.

आणखी वाचा – ‘हे मन बावरे’ मालिका पुन्हा येणार?, शशांक केतकर व मृणाल दुसानीसच्या व्हिडीओने वेधलं लक्ष, म्हणाला, “ही जोडी पुन्हा…”

“शेतावर काहीतरी नवं, हातानी बांधलेलं, प्रेमानी बांधलेलं” असं म्हणत मृण्मयीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच मृण्मयी-स्वप्नील यांनी त्यांचा यंदाचा गुढीपाडवा त्यांच्या शेतातल्या या मातीने व शेणाने बांधलेल्या घरात साजरा केल्याचेदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही घराबाहेर मोठी गुढी उभारतानाचे दृश्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांच्या या नवीन घराचे कौतुक केले आहे. “खूप सुंदर, खूपच छान, कमाल, खूप सुंदर आणि मातीची घर खूप छान असतात.” अशा अनेक कमेंट्सद्वारे अनेकांनी हे घर आवडल्याचे म्हटले आहे.    

Tags: marathi actressmarathi entertainment newsmrunmayee deshpande
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Titeeksha Tawde and Siddharth Bodke shared special photo from Goa after their marriage

लग्नानंतर ‘या’ ठिकाणी फिरायला गेले सिद्धार्थ व तितीक्षा, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष, राहत असलेल्या ठिकाणची खास झलकही दाखवली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.