सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची जोरदार चर्चा होत आहे. त्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘सिंघम अगेन’. २०११ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित व अजय देवगण स्टारर ‘सिंघम अगेन’ हा ‘सिंघम’ फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपट, तर रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणची या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली होती. आता अभिनेता टायगर श्रॉफची देखील या युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली असून त्याचा फर्स्ट लुक नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Tiger Shroff Singham Again first look)
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा लुक समोर आला होता. आता आज टायगरचा लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. टायगर या चित्रपटात एसीपी सत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा लुक शेअर केला आहे. ज्याला “एसीपी सत्या रिपोर्टींग ऑन ड्युटी सिंघम सर”, असं कॅप्शन त्याने दिलं आहे. टायगरचा हा कॉप लुक चित्रपटातील इतर कलाकारांनीही शेअर करत त्याचे स्वागत केले आहे. तसेच, चाहत्यांनीही पोस्टवर कमेंट करत आपला आनंद व्यक्त करत आहे.
हे देखील वाचा – “चाहत्यांची नजर लागली अन्…”, व्हिडीओ शेअर करत ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्रीने सांगितली व्यथा, म्हणाली, “मुलींच हे दुःख…”
रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, त्याच्यासह करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण हेदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या टायगर त्याच्या आगामी ‘गणपत’ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. जो येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.