बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाआधीच मुग्धा वैशंपायनने केली होणाऱ्या पतीची तक्रार, मुलाखतीदरम्यान उघड केलं गुपित, म्हणाली, “अलिकडे तू…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 19, 2023 | 4:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan On Prathamesh Laghate

लग्नाआधीच मुग्धा वैशंपायनने केली होणाऱ्या पतीची तक्रार, मुलाखतीदरम्यान उघड केलं गुपित, म्हणाली, "अलिकडे तू…"

‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत या जोडीने रिलेशनशिपमध्ये असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जोडींपैकी ही एक जोडी आहे. मुग्धा व प्रथमेश नेहमीच काही ना काही सोशल मीडियावरून शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Mugdha Vaishampayan On Prathamesh Laghate)

त्यानंतर आता प्रथमेश मुग्धाचा लग्नाबाबत भाष्य केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रथमेश व मुग्धा ‘वैचारिक किडा’ या युट्युब चॅनेलच्याच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी दिलेली मुलाखत पाहणं रंजक ठरतंय. या कार्यक्रमात घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत प्रथमेशने मुग्धाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळत आहेत. मुलाखती दरम्यान प्रथमेश व मुग्धा यांनी लग्नसंस्था हा विषय निवडला होता. या मुलाखतीदरम्यान प्रथमेशने मुग्धाला लग्नससंस्थेबाबत बरेच प्रश्न विचारले.

आणखी वाचा – Video : राजेशाही एन्ट्री, पार्टी अन्…; शिव ठाकरेने थाटात साजरा केला आजीचा ८१वा वाढदिवस, दिलं खास सरप्राईझ, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान प्रथमेशने मुग्धाला एक प्रश्न विचारला, त्यावेळी मुग्धाने उत्तर देत थेट लग्नाआधीच पतीची तक्रार केली. प्रथमेशने मुग्धाला प्रश्न केला की, “रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर असे कोणते मुलींचे प्रॉब्लेम्स असतात जे मुलं समजून घेत नाहीत, एखादा मी ही न समजून घेतलेला प्रॉब्लेम असू शकतो, काय सांगशील याबद्दल?” यावर मुग्धा उत्तर देत म्हणाली, “आता पटकन जे मला प्राब्लेम्स सुचत आहेत ते मी सांगते, बरेचदा मुलींना असं वाटत की, मुलांनी स्वतःहून मुलींना फोन केला पाहिजे. मीच का सतत फोन करायचा. समज आपण जर सात वेळा फोनवर बोलत असू तर किमान तीनदा फोन हे मुलांनीच केले पाहिजेत. आणि उरलेले फोन आम्ही करणार.”

आणखी वाचा – “चाहत्यांची नजर लागली अन्…”, व्हिडीओ शेअर करत ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्रीने सांगितली व्यथा, म्हणाली, “मुलींच हे दुःख…”

पुढे ती असंही म्हणाली की, “जास्तीत जास्त फोन हे मुलांकडून यायला हवे असं मुलींना वाटत. त्यावर मुग्धाला थांबवत प्रथमेशने विचारलं, तुलाही तसंच वाटत का? यावर हसत उत्तर देत मुग्धा म्हणाली, हो. अलीकडे तू फोन करू लागला आहेस, पण पूर्वी तसं नव्हतं. हा बदल तुझ्यात मीच घडवून आणला आहे.”

Tags: entertainmentmarathi singermugdha vaishampayanprathamesh laghateprathamesh laghate mugdha vaishampayan lovestory
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Jhimma 2 Released Soon

अखेर प्रतीक्षा संपली! सुपरहीट ठरलेल्या 'झिम्मा' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.