शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मावशी नाही तर आईच झाले”, बहीणीला मुलगी झाल्यानंतर तितीक्षाने व्यक्त केला आनंद, म्हणाली, “भाचीने काही मागितलं तर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 20, 2024 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tieeksha Tawde expressed the feeling of becoming a mother after her sister Khushboo give birth daughter

खुशबू तावडेला मुलगी झाल्यानिमित्ताने बहीण तितीक्षाने आई झाल्याची भावना व्यक्त केली आहे

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे. दोघींनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोघी नेहमीच चर्चेत असतात. दोघी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात आणि या दोघी एकमेकींबरोबरचे खास फोटोही शेअर करत असतात. त्याच्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. काही दिवसांपूर्वी २ ऑक्टोबरला खुशबू दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर खुशबूने आपल्या लेकीबरोबचा खास फोटो शेअर केला असून लेकीचे नावही सांगितले आहे. (Tieeksha Tawde On Khushboo Daughter)

खुशबूने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती संग्राम साळवी, मुलगा राघव आणि आपल्या गोंडस लेकीबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. खुशबूने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘राधी’ असं ठेवलं आहे. त्यानंतर खुशबूची बहीण व अभिनेत्री तितीक्षा तावडेने खुशबूच्या मुलीच्या जन्मदिवसाचा खास व्हिडीओही शेअर केला. तितीक्षा युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामुळे तिने खुशबूच्या मुलीच्या जन्मदिवसाचा खास व्हिडीओही शेअर केला होता आणि यावेळी ती भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : “इतका दिखावा करण्याची काय गरज?”, मजुरांबरोबर रस्त्यावर झोपताच सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

आता तितीक्षाने मावशी झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मावशी ही आई असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात तितीक्षा असं म्हणाली की, “असं म्हणतात की मावशी ही आईच असते आणि खरंही आहे. कारण ती भावना आपण वेगळी करू शकत नाही की आईला असं वाटते आणि मावशीला असं वाटतं. मावशीलाही तेवढच प्रेम आणि तेवढीच ओढ असते. दुसरी गोष्ट म्हणजे मावशी कुठे तरी जास्त लाडावून ठेवते. म्हणजे भाच्याने काही मागितलं आणि ते मावशीने दिलं नाही असं कधी होणार नाही”.

आणखी वाचा – “चुकून तिच्या पायावर…”, सुरज चव्हाणने सांगितली आईला झालेली ‘ती’ दुखापत, म्हणाला, “तेव्हा स्वत:लाच मारवसं वाटलं अन्…”

यापुढे तितीक्षा असं म्हणाली की, “आई-बाबा मुलांच्या बाबतीत थोडी शिस्त पाळून असतात. की त्याला मागितलं म्हणून लगेच गोष्टी द्यायला नको. पण माझं असं नाही, जितक्या वेळेस तो काही मागेल तितक्या वेळेस त्याला द्यायचं. तर हाच एक फरक आहे. बाकी काही फरक नाही. बहिणीच्या मुलांच्या बाबतीत आईचीच एक भावना असते”. दरम्यान, पहिल्यांदाच भाचीचा फोटो पाहून तितीक्षाला प्रचंड आनंद झाल्याचं पाहायला मिळाला होता. मावशी झाल्यानिमित्त तितीक्षावर व आई झाल्यानिमित्त खुशबूवर सध्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.      

Tags: khushboo tawdeKhushboo Tawde DaughterTieeksha Tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
शशांक केतकरने मालाडमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.

कचरा प्रकरणी पुन्हा एकदा भडकला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती, म्हणाला, “इतका निर्लज्जपणा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.