शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभंकर-अमृतानंतर आणखी एक कलाकार जोडीने बांधली लग्नगाठ, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम चेतन वडनेरेचा गर्लफ्रेंड ऋजुताबरोबर शाही विवाह संपन्न

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 22, 2024 | 3:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Thipkyanchi Rangoli serial fame Chetan Vadnere is just married with girlfriend Rujuta Dharap

शुभंकर-अमृतानंतर आणखी एक कलाकार जोडीने बांधली लग्नगाठ, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम चेतन वडनेरेचा गर्लफ्रेंड ऋजुताबरोबर शाही विवाह संपन्न

View Post

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराई सुरु आहे. नुकताच शुभंकर एकबोटे व अमृता बने या दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. बऱ्याच दिवसांपासून अमृता व शुभंकरच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. अमृता व शुभंकरचा पुणेरी थाटात शाही विवाह सोहळा पार पडला.  अशातच आता मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे आणि हा अभिनेता म्हणजे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेतन वडनेरे.   

अभिनेता चेतन वडनेरेने गर्लफ्रेंड ऋजूता धारपबरोबर विवाहगाठ बांधली आहे. चेतन-ऋजुता यांनी जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. चेतन-ऋतुजा काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि अखेर दोघांनी आज म्हणजेच २२ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कलाकारांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Chetan D Vadnere (@chetan_vadnere)

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अखेर अमृता बने व शुभंकर एकबोटे अडकले लग्नबंधनात, पुणेरी थाटामाटात उरकला विवाहसोहळा

चेतन-ऋजूताने त्यांच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेत. ‘कुर्यात सदा मंगलम्’ असं कॅप्शन देत चेतन-ऋजूताने लग्नाचे फोटो शेअर केलेत. चेतन-ऋजुता यांच्या लग्नातील पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चेतन-ऋजूता या दोघांनी ‘फुलपाखरु’ मालिकेत अभिनय केला होता. ‘फुलपाखरु’ मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

आणखी वाचा – शशांक केतकरला पाहून चाहत्यांचा आनंद अनावर, सफाई कर्मचारी महिलांना भेटला अन्…; अनुभव शेअर करत म्हणाला, “रोज रस्ता झाडून…”

यानंतर चेतन-ऋजूता यांनी काही वर्षापुर्वी त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला. या दोघांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते, काही महिन्यांपुर्वी साखरपुडा करुन दोघांनी आज एकमेकांबरोबर सात फेरे घेत लग्नगाठ बांधली आहे.

Tags: Chetan Vadneremarathi entertainment newsRujuta Dharap
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Ravi Jadhav, Sameer Vidwans, Saie Tamhankar, Siddharth Chandekar supported the trolling of Chinmay Mandalakar

“घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना…”, मराठी कलाकारांचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा व कारवाईची मागणी, म्हणाले, “आम्ही विनंती करतो की...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.