शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘त्या’ सीनसाठी गावकऱ्यांनी मदत केली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “शूटिंगमधील…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 4, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame actor Nikhil Bane shared video and said villagers helped him for the shooting.

'त्या' सीनसाठी गावकऱ्यांनी मदत केली अन्...; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “शूटिंगमधील...”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे निखिल बने. ‘भांडुपचा शशी कपूर’ अशी आपली वेगळी ओळख मिळवत अवघ्या महाराष्ट्रात आपली एक वेगळीच लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निखिल सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व त्याच्या कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या सक्रियतेमुळे व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील त्याचा चाहतावर्गही चांगलाच वाढला आहे.  

निखिल हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे तो त्याचं गावावरील प्रेम सोशल मीडियावर अनेक व्हिडीओद्वारे व्यक्त  करत असतो. सोशल मीडियाद्वारे निखिल आपल्या गावाकडच्या आठवणीही चाहत्यांबरोबर शेअर करत असतो आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे त्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना कोकणची खास सफर घडवून आणली आहे.  या व्हिडीओद्वारे त्याने त्याच्या कोकणातल्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्याचे हास्यजत्रेतील दोन मित्रदेखील आहेत.  

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

आणखी वाचा – रणवीर शौरीने ‘बिग बॉस’चा मोठा नियम मोडला, घरातच ओढली सिगरेट, अभिनेत्यावर प्रेक्षकांची टीका

निखिलने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेयर केला होता. ज्यामध्ये त्याने तो कोकणात शूटिंगला गेला असल्याचे म्हटले होते. अशातच निखिलने आणखी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या दिवसाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओद्वारे त्याने चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोकणात आलो नसून एका युट्यूब सीरिजच्या शूटिंगसाठी कोकणात आले असल्याचे म्हटले आहे. या सीरिजमध्ये तो शंकासुराची भूमिका करणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीची हिंदी वेबसीरिजमध्ये वर्णी, हृता दुर्गुळेबरोबर ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

यानंतर निखिल तो शूटिंग करत असलेल्या गावातील देवदर्शनासाठी गेल्याची खास झलकही त्याने दाखवली आहे. तसेच त्यांना या सीरिजमध्ये पालखी सोहळ्यासाठी त्यांना काही गावकऱ्यांची मदत हवी होती आणि  गावकऱ्यांनीती मदत केलीदेखील.  कोकणातील गावच्या या व्हिडीओवर निखिलने “शूटिंगमधील मज्जा मस्ती “ असं म्हटलं असून या व्हिडीओमार्फत त्याच्या चाहत्यांना कोकणात तो शूटिंग करत असलेल्या गावची खास सफर घडवली आहे.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi entertainment newsnikhil bane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Fandry fame Rajeshwari Kharat and Somnath Avaghade shared a cute video on social media

जब्याला शालू पटली! ‘फँड्री’ फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्ही लग्न...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.