शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीर चौघुलेंच्या हिंदीवरून कमेंट, हिंदीतील कलाकार आला की टीका; ‘हास्यजत्रे’च्या लेखक,दिग्दर्शकांचं रोखठोक मत, म्हणाले, “लोकांच्या भावना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 1, 2023 | 5:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sachin Goswami and Sachin Mote

समीर चौघुलेंच्या हिंदीवरून कमेंट, हिंदीतील कलाकार आला की टीका; 'हास्यजत्रे'च्या लेखक,दिग्दर्शकांचं रोखठोक मत, म्हणाले, "लोकांच्या भावना…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतलाय. या कार्यक्रमाचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार ही नेहमीच चर्चेत असतात. या कलाकारांचं, त्यांच्या स्किटचं, तसेच त्यांच्या भूमिकांचा सर्वत्र कौतुक होताना दिसतं. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारताबाहेरही या लोकप्रिय कार्यक्रमाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमाचे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ तसेच सर्वस्व मानले जाणारे लेखक दिग्दर्शक म्हणजे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. पडद्यामागे राहून आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जे काही नाव आहे ते या जोडीमुळेच आहे. (Sachin Goswami and Sachin Mote)

सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे नेहमीच कोणत्या ना कोणत्या आशयघन विषयावर भाष्य करताना दिसतात. एखाद्या विषयावर भाष्य करत ते त्यांची बाजू सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर देखील करतात. अशातच नुकतीच त्यांनी भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा, मस्ती, पॉडकास्ट’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी विविध विषयावर चर्चा केली. दरम्यान त्यांनी मराठी व हिंदी कलाकार यांच्यात जाणवणाऱ्या तफावतीबद्दल भाष्य केलं. तसेच मराठी कलाकारांना हिंदी भाषेत काम करताना पाहून त्यांच्यावर होणाऱ्या ट्रोलिंग बाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – मानेवर मांस ठेवल्यानंतर वाघाने उडी मारली अन्…; एका सीनसाठी जीव धोक्यात ठेऊन काम करत होता बॉबी देओल, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “त्याक्षणी वाघ…”

मराठी कलाकारांची बाजू सांभाळत सचिन मोटे म्हणाले, “मराठी कलाकार हिंदीमध्ये गेला की म्हणता ‘क्या बात हैं’, आमचा एक मराठी कलाकार हिंदीमध्ये गेला. हिंदी कलाकार मराठीमध्ये येऊन बसले की म्हणता यांना कशाला आणता मराठीच्या मंचावर, ‘आपल्याकडे काय माणसं कमी आहेत का?’ हिंदीत काही संवाद बोलले की लोकांच्या भावना दुखावतात, तर दुसरीकडे हिंदीमध्ये काम करण्याची त्याला प्रतिष्ठा देता. एखादा हिंदी कलाकार तोडक्या मोडक्या मराठीत बोलला की आपल्या इथे त्याच कौतुक करतात, क्या बात हैं, मराठीत बोलला वगैरे कमेंट करतात. मात्र मराठी भाषेतला विनोद मराठी कलाकारानेच केला तर तुम्ही काय आपली भाषा कशाही पद्धतीने बोलताय, असं म्हणता. किंवा समीर चौघुले असं हिंदी का बोलतोय, याने हिंदीचा अपमान होतोय, असं काहीजण म्हणतात, तर काहीजण ‘तू हिंदी का बोलतोस’, ‘तू मराठी आहेस ना मग हिंदीत का बोलतोय’ असं म्हणतात.

आणखी वाचा – “वो चाँद की क्या जरुरत है…”, घटस्फोटादरम्यान मानसी नाईक साजरा करतेय करवा चौथ, नेटकरी म्हणाले, “नवऱ्याला सोडून दिलंस अन्…”

यावर सचिन गोस्वामी यांनी आपलं मत मांडत म्हटलं की, “काहीजण हिंदी गाणी का वापरताय असंही म्हणतात. फक्त मराठी गाण्यांवर नाही होऊ शकत. आणि इतर बाकी गाणीही असतात. तुम्हीही घरी ऐकता की हिंदी गाणी. असं कोणी आहे का जो घरी केवळ मराठी गाणी ऐकतो, हिंदी गाणी ऐकतच नाही. असं नाही ना. आपल्याला लताजी का आवडल्या, मोहम्मद रफी का आवडतात. शास्त्रीय संगीताचा अपमान नाही का? असं विचारतात ना, तर मला नाही वाटत की त्यांना गाणी पाठ असतील. यांच्यात कुत्र्याचा शास्त्रीय संगीतात अपमान नाही करत. आता हा शास्त्रीय संगीताचा मान आहे ना की कुत्र्यालाही सुरात गावंस वाटतंय, हा तुमच्या संगीताचा मान नाही का?” असा सवाल त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना केला आहे.

Tags: entertainmentmaharashtrachi hasya jatramhjsachin goswamisachin mote
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Gayatri Joshi and Vikas Oberoi spotted after car Accident

Video : भीषण कार अपघातानंतर नवऱ्यासह पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अभिनेत्री गायत्री जोशी, आता कशी दिसते? व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.