एखादा माणूस त्याच्या कोणत्या तरी विशिष्ठ कारणासाठी ओळखला जातो. एखाद्याची कला किंवा विचार करण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवत असते. असाच एक वेगळ्या विचारांचा लेखक, दिगदर्शक, कवी असेलला माणूस या मराठी चित्रपट सृष्टीला लाभला आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे अभिनेते, दिगदर्शक नागराज मंजुळे. सैराट, नाळ, फॅन्ड्री, झुंड अशा अप्रतिम अनेक नावापासून ते कथे पर्यंत सगळं काही वेगळं असलेल्या कथांची मांडणी नागराज मंजुळे यांनी केली.(Nagraj Manjule Biopic)
सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अनेक इतिहास रचल्या नंतर सदाबहार अभिनेते अमिताभ बच्चन यांना घेऊन नागराज मंजुळे यांनी झुंडची निर्मिती केली. सैराट मधून घराघरात पोहचलेला परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर बिग बीं सोबत या चित्रपटात झळकला. तर आता पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्या नव्या आणि नेहमीप्रमाणे हटके नावासह येत असलेल्या घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनानिम्मित नागराज मंजुळे यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटकांचा उल्लेख केला आहे. सोबतच नागराज मंजुळे यांनी त्यांच्या वर जर बायोपिक आला तर त्याच नाव काय असावं या बद्दल सुद्दा खुलासा केला आहे. मुलाखती दरम्यान ‘मज्जागर्ल अंकिता लोखंडे'(MAJJAGIRL ANKITA LOKHNDE) ने विचारलेल्या ‘जर तुमच्यावर बायोपिक बनवण्यात आला तर नाव काय असावं?’ या प्रश्नाच्या उत्तरादखल त्यांनी सांगितले जर असा बायोपिक आलाच तर त्याच नाव ‘भटक्या” असं असावं.
हे देखील वाचा- ‘जिस देस मे गंगा रहता है’ मांजरेकरांनी दादांच्या ‘एकटा जीव सदाशिव’चा रिमके करण्याचा घाट घातला खरा पण….
आणि आण्णा म्हणाले…(Nagraj Manjule Biopic)
नागराज मंजुळे लोकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट काढतात स्वतःच मनोरंजन ते कस करतात या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की वेळ मिळाला की ते मित्रांसोबाबत भटकायला बाहेर पडतात. याच सोबत यांनी अनेक गोष्टींचा खुलासा या मुलाखतीत केला. नागराज मंजुळे कधी ही कोणता गेम खेळले नाहीत या गोष्टीला ही मुकलाखत अपवाद ठरली. आता पर्यंत प्रसार माध्यमांना दिलेला हा त्यांचा पहिला रॅपिड फायर आहे.(Nagraj Manjule Biopic)
नागराज मंजुळे घेऊन येत असलेला घर बंदूक बिरयाणी हा चित्रपट सुद्दा त्यांच्या या आधीच्या चित्रपटांच्या यशाच्या यादीत बसणार का हे पाहून रंजक ठरणार आहे. या चित्रपटात सुद्धा नागराज मंजुळे यांचं हुकुमाच पण ठरलेला आकाश ठोसर आणि अभिनतेरी सायली पाटील यांच्या सोबत अनुभवी जेष्ठ कलाकार सयाजी शिंदे यांनी खुद्द नागराज मंजुळे सुद्दा मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
