बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न, कलाकारही चित्रपटातील लूकमधून थेट मंचावर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 14, 2025 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
abhang Tukaram movie

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न, कलाकारही चित्रपटातील लूकमधून थेट मंचावर

abhang Tukaram movie : तुझा पाहुनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।
गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ।।
नाम तुकोबाचे घेता । डोले पताका डौलात ।।

या उक्तीची अनुभूती घेत माध्यम प्रतिनिधी आणि रसिकांच्या साक्षीने ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातील कलाकारांच्या साथीने अदभूत असा आनंद सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिरसात संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’नामाचा घोष करत आलेली दिंडी, चित्रपटातील कलाकारांनी केलेले सादरीकरण, गायकांनी सादर केलेले अभंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भक्ती-शक्ती संगमाचा ऐतिहासिक क्षण ‘याची देही याची डोळा’ रसिकांनी मनात साठवला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.आशिषजी शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. थोर संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव. प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्‌विचारांचे अभंगामृत ठेवणारे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्याच तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची जी शिदोरी दिली, हाच ठेवा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपटरूपाने ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – “बोल्ड कंटेंटसाठी कम्फर्टेबल नाही”, जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली, “हातातून काम निसटतंय…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी यांनी सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

आणखी वाचा – डोक्यावर टोपली, काम करुन थकवा अन्…; स्वत:च्या शेतात रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साधेपणाचं कौतुक

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

Tags: Abhang Tukarammarathi actormarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Atul Parchure

"तो नसल्याने थिएटरमध्ये गेलेच नाही", अतुल परचुरेंच्या निधनानंतर पत्नी सोनिया पहिल्यांदाच व्यक्त, मंचावर बोलताना अश्रू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.