Atul Parchure : अभिनेते अतुल परचुरे आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. हरहुन्नरी कलाकार आज आपल्यात नाही याचं दुःख कायम आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. अतुल यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली जी कधीच भरुन काढली जाणार नाही. तसेच त्यांचे निधन हे अनपेक्षित होते असेही त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितले होते. अशातच आता त्यांच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आणि त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठी कलाकारांनी अतुल यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं ठरवलं.
अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी या खास आठवणींच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी या कलाकारांनी अतुल यांचे अनेक किस्से, त्यांचा स्वभाव याबाबत भाष्य केलं. यावेळी अतुल यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्या मंचावर अतुल यांच्याशी बोलताना भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. कलाकार मित्रांच्या आग्रहाखातर सोनिया यांनी मंचावर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांच्या भावना दाटून आलेल्या पाहायला मिळाल्या.
आणखी वाचा – डोक्यावर टोपली, काम करुन थकवा अन्…; स्वत:च्या शेतात रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साधेपणाचं कौतुक
सोनिया म्हणाल्या, “माझं या रंगमंचाशी नातं जुळलं अतुलमुळेच. त्यामुळे अतुल नसताना कुठल्याही थिएटरमध्येही मला अजून जाता येत नाही आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही एवढे सगळेजण आले आहात, फारंच चांगलं वाटत आहे. आणि ३० वर्षात मी जे अतुलला बघितलंय आणि आता अतुल नसताना मी जो अतुल बघतेय तो एक वेगळाच अतुल आहे. त्याच्याविषयी इतके सगळेजण बोलतायत. अतुलचं मित्र प्रेम विनय म्हणाला की, शेवटचे पाच-सहा वर्ष ते एकत्र होते. खरंच आहे. लास्ट चार-पाच वर्षातील मी एकही सिनेमा अतुलबरोबर एकत्र पाहिला नाही कारण सगळे त्याने विनायबरोबर पाहिलेले असायचे”.
आणखी वाचा – “बोल्ड कंटेंटसाठी कम्फर्टेबल नाही”, जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली, “हातातून काम निसटतंय…”
शेवटी सोनिया म्हणाल्या, “आमच्या दोघांत हेच होतं की आम्ही एकमेकांचा खूप रिस्पेक्ट करायचो. सगळ्यांना खूप मनापासून थँक यु. अतुल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तो सतत म्हणत होता सुनीलला तू नाटकाबाबत सांगितलं आहेस ना”.





