शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी, चित्रपटात आई-मुलीच्या नात्याचा प्रवास उलगडणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2026 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tighee Marathi Movie

स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी, चित्रपटात आई-मुलीच्या नात्याचा प्रवास उलगडणार

Tighee Marathi Movie : स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अंतर्गत ताकदीचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या चित्रपटाचे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन सुरु आहे. आई- मुलींच्या नात्याची कथा सांगणारा हा चित्रपट केवळ नात्यांचा प्रवास नाही, तर तो स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देणारा आहे. याच विचारांशी सुसंगत पाऊल टाकत ‘तिघी’ची टीम पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सर्व्हायकल कॅन्सर तपासणी व एचपीव्ही लसीकरण मोहिमेत सहभागी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने २ मार्च ते ८ मार्चदरम्यान या रुग्णालयात महिलांसाठी तपासणी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. ही एचपीव्ही लसीकरण मोहीम ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी आहे. लहान वयात दिले जाणारे हे लसीकरण भविष्यात सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या उपक्रमातून प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या आरोग्याबाबत सजग राहून त्यांना वेळेवर लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असा ठाम संदेश दिला जात आहे. आई आपल्या मुलीला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे उत्तम आरोग्य आणि योग्य वेळी केलेले लसीकरण ही त्या भेटीची सुरक्षित सुरुवात आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.

आणखी वाचा – “भारताने माझा विश्वासघात केला”, इराणमधून आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला सोडायचाय देश, म्हणाली, “इथे सुरक्षित नाही”

महिलांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे, सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधाबाबत माहिती देणे आणि एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटातील नेहा पेंडसे , सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शिका जिजीविषा काळे सक्रियपणे सहभागी झाल्या असून महिलांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा संदेश देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ruby Hall Clinic (@rubyhallclinichospitalsgroup)

आणखी वाचा – बलात्काराची शिकार, लैंगिक संबंध आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “स्पॉट बॉयने…”

‘तिघी’ या चित्रपटात तीन स्त्रिया आपापल्या आयुष्यातील संघर्षांना सामोऱ्या जात स्वतःची ओळख निर्माण करतात, तसाच संदेश या मोहिमेतून दिला जात आहे. स्वतंत्र व्हा, सक्षम व्हा आणि स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहा. स्त्री ही केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी नाही, तर स्वतःच्या आयुष्याचीही ती समान भागीदार आहे, हा विचार अधोरेखित केला जात आहे.याबाबत नेहा पेंडसे म्हणते, “आपण घरासाठी, कुटुंबासाठी खूप काही करतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. ‘तिघी’मध्ये आम्ही ज्या सशक्त स्त्रियांची कथा सांगतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आरोग्यदृष्ट्या सजग राहाणे गरजेचे आहे. योग्य वयात लसीकरण ही तिच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पायरी आहे.”

सोनाली कुलकर्णी म्हणते, “स्वावलंबन म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर आरोग्यदृष्ट्याही सजग असणे महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थाची नव्हे तर सामर्थ्याची खूण आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण ही भविष्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक आहे. आई-मुलीचे नाते जसे जपले जाते, तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षणही जपले गेले पाहिजे.” या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

Tags: marathi actressmarathi movieTighee Marathi Movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Salbardi Movie Pooja Sawant

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज, 'सालबर्डी' चित्रपटात महत्वाची भूमिका, उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.