सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केस पांढरे झाले, हॉर्मोन्स बदलले आणि…; सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शरीराला घेऊन सहन केलाय त्रास, म्हणाली, “नकारात्मक विचार…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2025 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sumona Chakravarti body image

केस पांढरे झाले, हॉर्मोन्स बदलले आणि…; सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शरीराला घेऊन सहन केलाय त्रास, म्हणाली, "नकारात्मक विचार…"

Sumona Chakravarti body image : कलाकार मंडळी नेहमीच स्वतःला फिट ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. डाएट, व्यायाम याकडेही ही मंडळी अधिक लक्ष देतात. दरम्यान बऱ्याच अभिनेत्रींना त्यांच्या दिसण्यावरून हिणवले जाते. स्त्रियांचे केस बरेचदा कमी वयात पांढरे होतात आणि याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. सर्वसामान्यांप्रमाणे अनेक कलाकार मंडळींनाही या पांढऱ्या केसांचा त्रास सहन करावा लागतो. अशातच या आजाराला एका टेलिव्हिजन अभिनेत्रीलाही सामना करावा लागला आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती. टीव्हीची लोकप्रिय स्टार ही सुमोना आहे. तिने कपिल शर्मा शोमध्येही काम केले आहे.

कपिलच्या शोमध्ये सुमोनाने तिच्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली. या व्यतिरिक्त, ती बड़े अच्छे लगते हैं या शोमध्ये दिसली. सुमोनाने शरीराच्या प्रतिमेच्या आरोग्याबद्दल आणि वृद्धत्वाबद्दल काही दिवसांपूर्वीच भाष्य केलं आहे. तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पांढऱ्या केसांचे वाढते प्रमाण, हार्मोनल बदल, एंडोमेट्रिओसिस आणि आध्यात्मिक प्रवासाबद्दल भाष्य केलं. सुमोना म्हणाली की, राखाडी केसांबद्दल स्त्रियांचा नकारात्मक विचार आहे. स्त्रियांना बहुतेकदा राखाडी केस झाकण्यास सांगितले जाते. यावेळी अभिनेत्रीने सोसायटीत होणाऱ्या दुजाभावावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, पुरुषाच्या राखाडी केसांचे कौतुक केले जात असताना, स्त्रियांचे पांढरे केस हे एक वृद्धत्वाचे चिन्ह मानले जाते. सुमोना तिचे पांढरे केस दाखवण्यात कधीही कचरत नाही.

आणखी वाचा – “अपघात झाला, गाडी बंद पडली आणि…”, मराठी अभिनेत्याचा गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तासभर मदत मिळालीच नाही”

View this post on Instagram

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti)

सुमोना तिच्या 20 व्या वर्षांपासून विनोदी विश्वात कार्यरत आहे. तिच्या शरीराच्या प्रकारामुळे तिला फ्लॅट स्क्रीन म्हटले गेले. आता वयाच्या ३५ व्या वर्षी हार्मोनल बदल आणि एंडोमेट्रिओसिसमुळे ती वैतागली आहे. सुमोनाने एंडोमेट्रिओसिस नावाच्या रोगासह लढाई केली आहे. सुमोना हिचा असा विश्वास आहे की स्त्रियांनी स्वत: ला स्वीकारले पाहिजे. सौंदर्याचे ओझे वाटून घेऊ नये.

आणखी वाचा – “मी सदैव तुझं रक्षण करेन”, ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईला खास व्यक्तीने बांधली राखी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक

सुमोना असा विश्वास ठेवते की, केसांचा रंग, बोटोक्स असो किंवा लग्न असो महिलांची स्वतःची निवड असावी. काही दिवस सुमोना विपासनाकडे वळली होती, जी १० दिवसांचे साइलेंट मेडिटेशन री-ट्रीट करताना दिसली. सुमोना स्वत: ची प्रतिक्रिया देण्यास सर्वांकडून डिस्कनेक्ट झाली. २०११ मध्ये, तिने मानसिक आणि भावनिक शांततेच्या शोधात अनेक आध्यात्मिक मार्ग शोधले.

Tags: actress healthsumona chakravartiSumona Chakravarti health
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
actress nupur alankar left industry

२७ वर्षांच्या करिअरवर पाणी सोडलं, पतीला घटस्फोटही दिला नाही आणि…; आता जगतेय 'असं' आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.