सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कपिल शर्माने दारु पिऊन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्वीट, शुद्धीमध्ये आल्यानंतर मालदीवमध्ये राहावं लागलं कारण…; नेमकं काय घडलं होतं?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 2, 2024 | 11:54 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
kapil sharma tweet for pm modi

कपिल शर्माने दारु पिऊन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्वीट, शुद्धीमध्ये आल्यानंतर मालदीवमध्ये राहावं लागलं कारण...; नेमकं काय घडलं होतं?

दारूचे वाईट परिणाम सर्वांनाच माहीत आहेत. पण जर हे परिणाम तुम्हाला अगदीच भारी पडले तर ? असेच काहीसे झाले कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माबरोबर. पोट धरुन संपूर्ण भारताला हसवणाऱ्या कपिलला चक्क दारू प्यायल्यामुळे देश सोडावा लागला होता. त्याने एकदा नशेच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट (x) केले. त्याने केलेल्या ट्विटमुळे त्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. याबद्दलचा खुलासा त्याने स्वतः शो दरम्यान केला होता. (kapil sharma tweet for pm modi)

लहान पडद्यावरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून  कपिल घराघरात पोहोचला. आपल्या विनोदशैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. त्याने आपल्या मेहनतीने या क्षेत्रांमध्ये आपली वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण त्याने आजवर अनेक चुकादेखील केल्या ज्याबद्दल त्याला अजूनही जाणीव आहे. याबद्दल त्याने २८ जानेवारी २०२२ रोजी नेटफ्लिक्सवरील ‘आय एम नॉट डन येट’ या शोमध्ये खुलासा केला होता. यावेळी त्याने पंतप्रधानांना केलेल्या ट्विट(x)बद्दल खुलासा केला होता.

आणखी वाचा – वानखेडेवर हार्दिक पांड्या ट्रोल झालेला रोहित शर्माला बघवेना, मनाचा मोठेपणा दाखवत केलेल्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पंतप्रधान मोदी यांना केलेल्या ट्विट (x)मध्ये त्याने लिहिले होते की, “मी गेल्या पाच वर्षापासून १५ कोटी रुपये कर भरला आहे. तरीही मला माझे ऑफिस बनवण्यासाठी बीएमसी ऑफिसला पाच लाख रुपयांची लाच द्यावी लागली”, कपिलने हे ट्वीट लिहून पंतप्रधान मोदी यांना टॅग केले होते. त्याने हा किस्सा सांगतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.

त्याने व्हिडीओमध्ये म्हंटले आहे की, “हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर मी भारताबाहेर पडलो. मी मालदीवमध्ये  आठ ते नऊ दिवस राहिलो. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा इंटरनेट नसलेली रुम मागितली. बाकी लोक लग्न करुन येतात मी ट्विट करुन आलो आहे, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण मी जितके दिवस तिथे राहिलो तिथे तब्बल ९ लाख रुपये माझा खर्च झाला. आतापर्यंत जितका खर्च माझ्या शिक्षणावर नाही झाला तितका खर्च मी ते ट्वीट करुन केला आहे”.

आणखी वाचा – “नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्…”, जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, “त्याची रोजची फरपट…”

पुढे तो म्हणाला की, “मला ट्विटरवर केस करायची आहे. ट्विटरवाले अनेकदा राजकारण्याच्या ट्विटवर मॅन्यूपलेटेड ट्वीट म्हणून लिहितात मग माझ्या ट्विट वर पण ड्रंक ट्विट, याच्या ट्विटकडे दुर्लक्ष करा असे लिहिले पाहिजे होते. निदान माझे पैसे वाचले असते. मला या देशाची व्यवस्था समजत नाही. जर मी रात्रीच्या वेळी ट्विट केले आहे तर माझ्याशी तुम्ही देखील रात्रीच बोला आणि विषय संपवा. काही विवादात्मक ट्वीट असतील तरीही तुम्ही एखाद्या कलाकाराला ब्लॅक लिस्ट नाही करु शकत”.

या कृतीसाठी कपिलणे सार्वजनिक माफीदेखील मागितली आहे. तसेच अनेकदा या गोष्टीवर स्वतःवर मस्करीदेखील केली आहे. कपिलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सुरु आहे. यावेळी हा शो टीव्ही चॅनलवर नाही तर ओटीटीवर येत आहे.  

Tags: kapil sharmapm narendra moditweeterviral tweet
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Amruta Khanvilkar On Husband

Video : गेट वे ऑफ इंडियाला बोट बूक केली, समुद्रात सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरने नवऱ्याला दिलं सरप्राइज, रोमँटिक व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.