बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कमळी’ फेम अभिनेत्री होणार आई; ‘ती’ पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझा प्रेग्नन्सीचा प्रवास…पाचवा महिना”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2026 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kamali Fame Actress become mother

‘कमळी’ मालिकेतील फेम अभिनेत्री होणार आई

Kamali Fame Actress become mother : ‘कमळी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिकेतील कथा, ट्विस्ट आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ती टीआरपीच्या शर्यतीतही कायम चर्चेत असते. मालिकेत विजया बाबर, इला भाटे, निखिल दामले, आशा शेलार आणि केतकी कुलकर्णी यांसारखे अनेक दमदार कलाकार झळकत आहेत. दरम्यान, या मालिकेत राधिका म्हणजेच हृषीची वहिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर सध्या खास कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सईने ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला होता. राधिका या भूमिकेमुळे सईला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत आहे.

अलीकडेच सईने मालिकेच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो त्या काळातील आहेत जेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती होती आणि त्याच दरम्यान तिला पहिल्यांदाच आपल्या बाळाची हालचाल जाणवली होती. या खास क्षणाबद्दल सईने भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. ती लिहिते, “माझ्या प्रेग्नन्सीचा प्रवास… पाचवा महिना. जेव्हा पहिल्यांदा मला बाळाची चाहूल लागली, त्याची हालचाल जाणवली… तो क्षण आणि ती भावना शब्दांत व्यक्त करणे खरंच कठीण आहे. हा अनुभव मी कायम माझ्या मनात जपून ठेवेन.” सईने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत तिच्या नव्या प्रवासासाठी आशीर्वाद दिले आहेत.

आणखी वाचा – लग्नाच्या दोन वर्षातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट?, व्यवसायकाशी केलेलं लग्न, स्वतःच म्हणाली, “आम्ही वेगळे राहतो आणि…”

View this post on Instagram

A post shared by Sai Kalyankar (@saisudhirkalyankar)

यापूर्वी सईच्या डोहाळे जेवणाचा सोहळाही मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या समारंभाला सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान आणि तन्वी बर्वे या अभिनेत्री उपस्थित होत्या. या तिघींनी सईसोबत ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत काम केलं होतं. त्या मालिकेनंतरही त्यांची मैत्री तशीच टिकून असल्याचं या प्रसंगातून पाहायला मिळालं. सई कल्याणकर सध्या तिच्या आयुष्यातील या सुंदर टप्प्याचा आनंद घेत असून तिचे चाहतेही तिच्या या नव्या प्रवासासाठी तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘लग्नानंतर होईलच…’मध्ये रम्यामुळे काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनीमध्ये भांडण?, संसारात लावली आग; मोठा TWIST

Tags: entertainment newsKamali Fame Actress become mothermarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Rumani Khare wedding

सुप्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; शाही विवाहसोहळ्याने वेधलं लक्ष, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.